अनुराधा पौडवाल बऱ्याच कालावधीनंतर नुकत्याच एका मुलाखतीसाठी समोर आल्या. त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक कारकिर्दीपर्यंत सर्व विषयांवर भाष्य केले. या ज्येष्ठ गायिकेने राम मंदिरातील देणग्यांच्या चोरीवरही प्रतिक्रिया दिली आणि भारत विश्वगुरू कसा बनू शकतो, असा प्रश्न उपस्थित केला.

याच मुलाखतीत त्यांनी राम मंदिरातील देणग्यांच्या कथित चोरीच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना भारताला “विश्वगुरू” म्हणण्यापूर्वी अनेक मूलभूत गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली. मात्र, या चर्चेबरोबरच त्यांच्या साध्या, शांत आणि भक्तिमय घरानेही अनेकांचे लक्ष वेधून घेतले. आलिशानपणापेक्षा साधेपणा, प्रसन्नता आणि अध्यात्म यांना प्राधान्य देणारे त्यांचे घर अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. त्यांनी त्याच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहे त्यामध्ये त्यांचे घर पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य :- @paudwal.anuradha_official)
कमळाच्या पेंटिंगमुळे वाढते घराची शोभा
घरातील भिंतींवर लावलेले कमळाचे सुंदर पेंटिंग लगेचच लक्ष वेधून घेते. भारतीय संस्कृतीत कमळाला पवित्रता, शुद्धता आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे अशा प्रकारचे कलात्मक पेंटिंग केवळ घराची शोभा वाढवत नाही, तर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासही मदत करते. जर तुम्हालाही घरात शांत आणि प्रसन्न वातावरण तयार करायचे असेल, तर अशा प्रकारची भारतीय शैलीतील चित्रे उत्तम पर्याय ठरू शकतात.
कमळाचे पेंटिंग हॉल, पूजा खोली, बेडरूम किंवा प्रवेशद्वाराजवळ लावल्यास घराला आकर्षक आणि आल्हाददायक लूक मिळतो. गुलाबी, पांढऱ्या किंवा निळ्या रंगातील कमळाची चित्रे घरातील सजावटीशी सहज जुळून येतात आणि जागेला अधिक प्रशस्त व उजळ वाटण्यास मदत करतात. वास्तुशास्त्रानुसारही कमळाचे चित्र घरात सुख, समृद्धी आणि मानसिक शांततेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे आधुनिक आणि पारंपरिक अशा दोन्ही प्रकारच्या इंटिरिअरमध्ये कमळाच्या पेंटिंगचा समावेश केल्यास घराचे सौंदर्य अनेक पटींनी खुलून दिसते.
वॉलपेपरमुळे वाढतो इंटिरिअरचा आकर्षकपणा
घरातील काही भागांमध्ये सुंदर आणि सौम्य डिझाइनचे वॉलपेपर वापरण्यात आले आहेत. भिंतींना वेगळा लूक देण्यासाठी वॉलपेपर हा उत्तम पर्याय ठरतो. मात्र, अनुराधा पौडवाल यांच्या घरात अतिशय गडद किंवा भडक डिझाइनऐवजी साधे आणि एलिगंट पॅटर्न निवडण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण घराचा समतोल आणि सौंदर्य कायम राहते.
सुंदर देवघर आहे घराचे खास आकर्षण
अनुराधा पौडवाल यांच्या घरातील सर्वात खास जागा म्हणजे त्यांचे सुंदर मंदिर. त्यांच्या आयुष्यात भक्तीला असलेले महत्त्व या देवघरातून स्पष्टपणे दिसून येते. मंदिराची सजावट अतिशय साधी असून स्वच्छता आणि नीटनेटकेपणाला विशेष महत्त्व दिले आहे. देवघरात मूर्ती, समई, फुले आणि पूजेच्या आवश्यक वस्तूंची सुंदर मांडणी करण्यात आली आहे. घरात असे शांत आणि पवित्र स्थान असल्यामुळे संपूर्ण वातावरण अधिक सकारात्मक वाटते.
अनुराधा पौडवाल घर
साधे पडदे देतात एलिगंट लूक
घरातील पडद्यांची निवडही अत्यंत साधी पण आकर्षक आहे. जड भरतकाम किंवा गडद रंगांचे पडदे न वापरता हलक्या रंगांचे आणि साध्या डिझाइनचे पडदे लावण्यात आले आहेत. त्यामुळे सूर्यप्रकाश सहज घरात येतो आणि संपूर्ण घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते. अशा प्रकारचे पडदे कोणत्याही इंटिरिअरशी सहज जुळून येतात.
घरात प्रवेश करताच जाणवते सकारात्मक ऊर्जा
अनुराधा पौडवाल यांच्या घरात प्रवेश करताच सर्वप्रथम जाणवते ती शांतता आणि सकारात्मकता. घराचा प्रत्येक कोपरा अतिशय नीटनेटका आणि साधेपणाने सजवलेला आहे. कोणताही दिखाऊपणा किंवा अनावश्यक सजावट न करता, मोजक्या वस्तूंमधून सुंदर आणि प्रसन्न वातावरण तयार करण्यात आले आहे. त्यामुळे घर अधिक प्रशस्त आणि आरामदायी वाटते.
घरातून मिळतात या होम डेकोर आयडिया
जर तुम्ही तुमच्या घराचे इंटिरिअर बदलण्याचा विचार करत असाल, तर अनुराधा पौडवाल यांच्या घरातून काही सोप्या कल्पना घेऊ शकता.
- भिंतींसाठी हलक्या रंगांची निवड करा.
- कमळ किंवा भारतीय कलेवर आधारित पेंटिंग लावा.
- साधे आणि हलक्या रंगांचे पडदे वापरा.
- घरात स्वतंत्र आणि स्वच्छ देवघर तयार करा.
- निवडक भिंतींवर एलिगंट वॉलपेपर वापरा.
- हलक्या रंगांचे आणि आरामदायी फर्निचर निवडा.
- घरात अनावश्यक वस्तूंची गर्दी टाळा आणि मोकळी जागा ठेवा.

