Headlines

‘विश्वगुरू म्हणणं बंद करा’ म्हणणाऱ्या अनुराधा पौडवाल यांचं सुबक घर; प्रत्येक कोपऱ्यात भक्ती आणि वात्सल्याची अनुभूती – anuradha paudwal talks about vishwa guru dream take her house tour to get small home decor ideas


अनुराधा पौडवाल बऱ्याच कालावधीनंतर नुकत्याच एका मुलाखतीसाठी समोर आल्या. त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक कारकिर्दीपर्यंत सर्व विषयांवर भाष्य केले. या ज्येष्ठ गायिकेने राम मंदिरातील देणग्यांच्या चोरीवरही प्रतिक्रिया दिली आणि भारत विश्वगुरू कसा बनू शकतो, असा प्रश्न उपस्थित केला.

Anuradha Paudwal House
फोटो सौजन्य :- @paudwal.anuradha_official
भारतीय संगीतविश्वातील ज्येष्ठ आणि लोकप्रिय गायिका अनुराधा पौडवाल या आपल्या मधुर आवाजामुळे अनेक दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. भजन असोत, चित्रपटातील गाणी असोत किंवा आध्यात्मिक कार्यक्रम अनुराधा पौडवाल यांनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बऱ्याच कालावधीनंतर त्या नुकत्याच एका मुलाखतीत दिसल्या. या मुलाखतीत त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यापासून ते संगीत कारकिर्दीपर्यंत अनेक विषयांवर मोकळेपणाने संवाद साधला.

याच मुलाखतीत त्यांनी राम मंदिरातील देणग्यांच्या कथित चोरीच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना भारताला “विश्वगुरू” म्हणण्यापूर्वी अनेक मूलभूत गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली. मात्र, या चर्चेबरोबरच त्यांच्या साध्या, शांत आणि भक्तिमय घरानेही अनेकांचे लक्ष वेधून घेतले. आलिशानपणापेक्षा साधेपणा, प्रसन्नता आणि अध्यात्म यांना प्राधान्य देणारे त्यांचे घर अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. त्यांनी त्याच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहे त्यामध्ये त्यांचे घर पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य :- @paudwal.anuradha_official)

कमळाच्या पेंटिंगमुळे वाढते घराची शोभा

कमळाच्या पेंटिंगमुळे वाढते घराची शोभा

घरातील भिंतींवर लावलेले कमळाचे सुंदर पेंटिंग लगेचच लक्ष वेधून घेते. भारतीय संस्कृतीत कमळाला पवित्रता, शुद्धता आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे अशा प्रकारचे कलात्मक पेंटिंग केवळ घराची शोभा वाढवत नाही, तर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासही मदत करते. जर तुम्हालाही घरात शांत आणि प्रसन्न वातावरण तयार करायचे असेल, तर अशा प्रकारची भारतीय शैलीतील चित्रे उत्तम पर्याय ठरू शकतात.

कमळाचे पेंटिंग हॉल, पूजा खोली, बेडरूम किंवा प्रवेशद्वाराजवळ लावल्यास घराला आकर्षक आणि आल्हाददायक लूक मिळतो. गुलाबी, पांढऱ्या किंवा निळ्या रंगातील कमळाची चित्रे घरातील सजावटीशी सहज जुळून येतात आणि जागेला अधिक प्रशस्त व उजळ वाटण्यास मदत करतात. वास्तुशास्त्रानुसारही कमळाचे चित्र घरात सुख, समृद्धी आणि मानसिक शांततेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे आधुनिक आणि पारंपरिक अशा दोन्ही प्रकारच्या इंटिरिअरमध्ये कमळाच्या पेंटिंगचा समावेश केल्यास घराचे सौंदर्य अनेक पटींनी खुलून दिसते.

वॉलपेपरमुळे वाढतो इंटिरिअरचा आकर्षकपणा

वॉलपेपरमुळे वाढतो इंटिरिअरचा आकर्षकपणा

घरातील काही भागांमध्ये सुंदर आणि सौम्य डिझाइनचे वॉलपेपर वापरण्यात आले आहेत. भिंतींना वेगळा लूक देण्यासाठी वॉलपेपर हा उत्तम पर्याय ठरतो. मात्र, अनुराधा पौडवाल यांच्या घरात अतिशय गडद किंवा भडक डिझाइनऐवजी साधे आणि एलिगंट पॅटर्न निवडण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण घराचा समतोल आणि सौंदर्य कायम राहते.

सुंदर देवघर आहे घराचे खास आकर्षण

सुंदर देवघर आहे घराचे खास आकर्षण

अनुराधा पौडवाल यांच्या घरातील सर्वात खास जागा म्हणजे त्यांचे सुंदर मंदिर. त्यांच्या आयुष्यात भक्तीला असलेले महत्त्व या देवघरातून स्पष्टपणे दिसून येते. मंदिराची सजावट अतिशय साधी असून स्वच्छता आणि नीटनेटकेपणाला विशेष महत्त्व दिले आहे. देवघरात मूर्ती, समई, फुले आणि पूजेच्या आवश्यक वस्तूंची सुंदर मांडणी करण्यात आली आहे. घरात असे शांत आणि पवित्र स्थान असल्यामुळे संपूर्ण वातावरण अधिक सकारात्मक वाटते.​

अनुराधा पौडवाल घर

साधे पडदे देतात एलिगंट लूक

साधे पडदे देतात एलिगंट लूक

घरातील पडद्यांची निवडही अत्यंत साधी पण आकर्षक आहे. जड भरतकाम किंवा गडद रंगांचे पडदे न वापरता हलक्या रंगांचे आणि साध्या डिझाइनचे पडदे लावण्यात आले आहेत. त्यामुळे सूर्यप्रकाश सहज घरात येतो आणि संपूर्ण घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते. अशा प्रकारचे पडदे कोणत्याही इंटिरिअरशी सहज जुळून येतात.

घरात प्रवेश करताच जाणवते सकारात्मक ऊर्जा

घरात प्रवेश करताच जाणवते सकारात्मक ऊर्जा

अनुराधा पौडवाल यांच्या घरात प्रवेश करताच सर्वप्रथम जाणवते ती शांतता आणि सकारात्मकता. घराचा प्रत्येक कोपरा अतिशय नीटनेटका आणि साधेपणाने सजवलेला आहे. कोणताही दिखाऊपणा किंवा अनावश्यक सजावट न करता, मोजक्या वस्तूंमधून सुंदर आणि प्रसन्न वातावरण तयार करण्यात आले आहे. त्यामुळे घर अधिक प्रशस्त आणि आरामदायी वाटते.

घरातून मिळतात या होम डेकोर आयडिया

घरातून मिळतात या होम डेकोर आयडिया

जर तुम्ही तुमच्या घराचे इंटिरिअर बदलण्याचा विचार करत असाल, तर अनुराधा पौडवाल यांच्या घरातून काही सोप्या कल्पना घेऊ शकता.

  • भिंतींसाठी हलक्या रंगांची निवड करा.
  • कमळ किंवा भारतीय कलेवर आधारित पेंटिंग लावा.
  • साधे आणि हलक्या रंगांचे पडदे वापरा.
  • घरात स्वतंत्र आणि स्वच्छ देवघर तयार करा.
  • निवडक भिंतींवर एलिगंट वॉलपेपर वापरा.
  • हलक्या रंगांचे आणि आरामदायी फर्निचर निवडा.
  • घरात अनावश्यक वस्तूंची गर्दी टाळा आणि मोकळी जागा ठेवा.
मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा