IND vs ENG 1st ODI News : भारत-इंग्लंड पहिल्या वनडे सामना सुरु झाला आहे. पण आता टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफबाबत मोठी माहिती समोर आली आहे. गौतम गंभीर यांच्या विश्वासू सहाय्यकाबाबत चर्चांना उधाण आले आहे. नेमके काय घडतेय?
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघ आधीच बॅकफूटवर असताना, आता ड्रेसिंग रूमबाहेरून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची इच्छा BCCI कडे व्यक्त केली आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या अत्यंत जवळचे आणि त्यांचे राइट हँड मानले जाणारे डोशेट अचानक संघ सोडणार असल्याने भारतीय क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे.
लॉर्ड्सवरील वनडे सामना ठरू शकतो शेवटचा
‘क्रिकबझ’ने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मंजुरीनंतरच यावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल. जर बीसीसीआयकडून परवानगी मिळाली, तर १९ जुलै रोजी लॉर्ड्स येथे होणारा भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि अंतिम वनडे सामना हा रायन टेन डोशेट यांचा टीम इंडियासोबतचा अखेरचा सामना ठरू शकतो.
महत्त्वाची बाब म्हणजे, डोशेट यांच्या या निर्णयामागे संघातील अंतर्गत वातावरण किंवा कोणतीही नाराजी कारणीभूत नाही. हा निर्णय त्यांनी पूर्णपणे वैयक्तिक कारणांमुळे घेतला असून बीसीसीआयसोबत परस्पर सहमतीनेच ही प्रक्रिया पार पडणार आहे.
दरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाच्या बॉलर्सनी धारदार कामगिरी करत यजमान इंग्लंडला सुरुवातीला बॅकफूटवर ढकललं. टॉस गमावून पहिल्यांदा फिल्डिंग करणाऱ्या भारतीय संघाने नियमित अंतराने विकेट्स घेत इंग्लंडची अवस्था बिकट केली होती. मात्र, अनुभवी जो रूट आणि लियाम डॉसन यांनी संयमी भागीदारी करत इंग्लंडचा डाव सावरला आहे.
बुमराहने ८ ओव्हर्समध्ये अवघे २४ रन्स देत इंग्लंडचा कॅप्टन हॅरी ब्रूकला (१) स्वस्तात बाद केले. कर्णधार रोहित शर्माने त्याचा शानदार कॅच घेतला. दुसरीकडे, प्रसिद्ध कृष्णाने अप्रतिम बॉलिंग करत ८ ओव्हर्समध्ये २ मेडन ओव्हर्ससह ३४ रन्स देत जॉस बटलर (५) आणि सॅम करन (०) यांना लागोपाठ पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला, सध्या इंग्लंडचा खेळ २१४-६ धावांवर सुरु आहे. हे आकडे ४२ ओव्हर्सपर्यंतचे आहेत.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा