Headlines

फिफा वर्ल्ड कप 2026चा पहिला सेमी फायनल सामना स्पेन वि. फ्रान्स, कोण मारणार बाजी? किती वाजता सुरू होणार थरार?


FIFA World Cup 2026 Semi Final 1 : वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि फ्रान्स यांच्यात आज, मंगळवारी मध्यरात्री उपांत्य लढत रंगणार असून, या प्रतिस्पर्ध्यांना हॅट्ट्रिक खुणावत आहे. स्पेनला फ्रान्सविरुद्धचा उपांत्य फेरीतील सलग तिसरा विजय खूणावत आहे, त्याच वेळी फ्रान्सला सलग तिसऱ्या वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे.

FIFA World Cup 2026 Semi Final 1
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : फ्रान्सने संभाव्य विजेत्यास साजेशी कामगिरी करीत उपांत्य फेरी गाठली. त्यांची खरी परीक्षा स्पेनविरुद्ध असेल. स्पेनने स्पर्धेत एकच गोल स्वीकारला आहे. फ्रान्सने २०१८मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता, तर २०२२च्या स्पर्धेत ते उपविजेते होते; मात्र स्पेनने २०२४च्या युरो स्पर्धेच्या उपांत्य फेरीत; तसेच गत वर्षीच्या युरो नेशन्स लीगच्या उपांत्य फेरीत फ्रान्सला नमवले आहे. त्यामुळे फ्रान्सला स्पेनपासून मोठा धोका आहे. आज मध्यरात्री १२.३० वाजता सामन्याला सुरूवात होणार असून डलास स्टेडियम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे हा सामना पार पडणार आहे. आतापर्यंत हेड टू हेडमध्ये ३८ सामन्यांत स्पेनचे १८-१३ असे वर्चस्व (गोलफरक ७१ : ४४) राहिले आहे

स्पेनचा संघ म्हणजे केवळ लामिन यमालच नाही हे फ्रान्स संघ जाणतो. स्पेनवरील दडपणही कमी नाही. फ्रान्सने गेल्या सातपैकी चार वर्ल्ड कप स्पर्धांत अंतिम फेरी गाठली आहे. या वेळीही फ्रान्सने उपांत्य फेरीत यश मिळवल्यास त्यांची तुलना १९७४ ते १९९० दरम्यानच्या पाचपैकी चार स्पर्धांत अंतिम फेरी गाठलेल्या पश्चिम जर्मनीच्या कामगिरीशी होईल.
Maharashtra TimesArgentina vs Egypt Match : इजिप्तचा अर्जेंटिनाविरूद्धचा विजय रेफ्रींनी चोरला’; न्यूयॉर्कच्या महापौरांकडून बोचरी टीका, 11 मिनिटात झालेले 3 गोल
स्पेनच्या बचावफळीची स्पर्धेतील सर्वोत्तममध्ये गणना होत आहे. केप वर्देविरुद्धची लढत सोडल्यास स्पेनचा धडाका दिसला आहे. अर्थात, २०२४च्या युरो स्पर्धेच्या वेळी एम्बापे पूर्ण बहरात नव्हता; मात्र या वेळी वर्ल्ड कप पात्रतेपासून एम्बापे आणि देम्बेले यांनी प्रतिस्पर्थ्यांना हादरवले आहे. फ्रान्सचा वेगच स्पेनसमोर जास्त आव्हान असेल. ब्राझीलने १९९४ ते २००२च्या तिन्ही स्पर्धांत अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर अशी कामगिरी करण्याची फ्रान्सला संधी आहे.
Maharashtra TimesErling Haaland : विश्व फुटबॉलचा नवीन हिरो, नॉर्वेचं ‘गोल मशीन’, एर्लिंग हालँड नेमका कोण? पोरानं बापाचं नाव काढलं, संपूर्ण प्रवास जाणून घ्या

प्रतिस्पर्ध्यांमधील चुरस

  • खेळानुसार खेळाडूंचे स्वरुप बदलण्याची दोन्ही संघांची हातोटी. त्यातही स्पेनची मदार भक्कम मधल्या फळीवर
  • पाच बचावपटू आणि तीन आक्रमकांनी बचाव करणारे स्पेन प्रतिस्पर्ध्यांच्या गोलक्षेत्रानजीक सहा आक्रमक, एक मध्यरक्षक आणि तीन बचावपटूंसह खेळतात.
  • आपल्या खेळाच्या शैलीत वेगाने बदल करण्याची फ्रान्सची हातोटी. प्रतिआक्रमण सुरू झाल्यावर दोन बचावपटूंच्या मदतीला एक मध्यरक्षक राहतो. मधल्या फळीतील सहा खेळाडू एकमेकांच्या साथीत वाटचाल करतात आणि गोलक्षेत्राच्या नजीक असलेल्या एम्बापेला अधिकाधिक संधी असताना चेंडू पास करतात.
  • बचाव असतानाही एम्बापे मध्यरेषेच्या नजीक प्रामुख्याने असतो; मात्र याच वेळी प्रतिस्पर्ध्याच्या चाली मधल्या भागात रोखण्याचा फ्रान्सचा जास्त प्रयत्न
  • बचाव करताना प्रतिस्पर्ध्याच्या आक्रमकांवर आपले अधिकाधिक खेळाडू कसे राहतील, याकडे स्पेनचे लक्ष. प्रसंगी आक्रमकांस मागे पास देण्याशिवाय पर्याय राहणार नाही

लक्षवेधक…

  • फ्रान्सचे या स्पर्धेतील १६पैकी ११ गोल उत्तरार्धात
  • फ्रान्सचे या स्पर्धेत सरासरी ऑन टार्गेट प्रयत्न ७.८. सर्व संघांत सर्वोत्तम
  • स्पेनच्या गेल्या १६पैकी चारच सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांचे गोल
  • लामिन यमालचे फ्रान्सविरुद्ध दोन सामन्यांत तीन गोल
  • स्पेनने गेल्या ३६ सामन्यांत ९० मिनिटांत हार पत्करलेली नाही. त्यात २६ विजय आणि १० बरोबरी
  • स्पेनने प्रतिस्पर्ध्यांतील गेल्या दहापैकी सात लढती जिंकल्या आहेत.
  • स्पर्धेत स्पेनविरुद्ध एक, तर फ्रान्सविरुद्ध दोन गोल; मात्र याच वेळी फ्रान्सचे १६ गोल, तर स्पेनचे ११.
हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा