Headlines

AC चे उरलेले पाणी फेकून देताय ? पाणी वाया घालू नका या हटके पद्धतींचा करा वापर – ac water reuse tips how to use air conditioner water for home cleaning


एअर कंडिशनर हा अनेक घरांमध्ये गरजेचा भाग बनला आहे. AC चालू असताना त्यातून सतत पाणी बाहेर पडत असते. अनेकजण हे पाणी थेट ड्रेनेजमध्ये सोडतात किंवा फेकून देतात. मात्र, हे पाणी काही घरगुती कामांसाठी उपयुक्त ठरू शकते. पाण्याची वाढती टंचाई लक्षात घेता उपलब्ध प्रत्येक थेंबाचा योग्य वापर करणे ही काळाची गरज आहे. योग्य काळजी घेतल्यास AC मधून निघणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करून पाण्याची बचत करता येते.

AC Water Reuse
फोटो सौजन्य :- @iStock
AC हा अनेक घरांमध्ये गरजेचा भाग बनला आहे. विशेषतः उन्हाळ्यात वाढते तापमान आणि दमट हवामान यामुळे घर, कार्यालये आणि व्यावसायिक ठिकाणी AC चा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. AC चालू असताना त्यातून सतत पाणी बाहेर पडत असते. अनेकजण हे पाणी थेट ड्रेनेजमध्ये सोडतात किंवा फेकून देतात. मात्र, हे पाणी काही घरगुती कामांसाठी उपयुक्त ठरू शकते. पाण्याची वाढती टंचाई लक्षात घेता उपलब्ध प्रत्येक थेंबाचा योग्य वापर करणे ही काळाची गरज आहे. योग्य काळजी घेतल्यास AC मधून निघणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करून पाण्याची बचत करता येते. AC मधून बाहेर पडणारे पाणी हे हवेतील आर्द्रतेचे संघनन होऊन तयार होते. त्यामुळे ते पावसाचे किंवा भूजलाचे पाणी नसते.

हे पाणी दिसायला स्वच्छ असले तरी ते थेट पिण्यासाठी किंवा स्वयंपाकासाठी वापरणे सुरक्षित नाही. मात्र, साफसफाई, वाहन धुणे, बाथरूम स्वच्छ करणे, अंगणातील धूळ कमी करणे यांसारख्या अनेक घरगुती कामांसाठी याचा सहज वापर करता येतो. आज अनेक शहरांमध्ये पाणीटंचाई ही गंभीर समस्या बनली आहे. अशा परिस्थितीत AC मधून दररोज जमा होणारे काही लिटर पाणीही योग्य प्रकारे वापरले, तर महिन्याभरात शेकडो लिटर पाण्याची बचत होऊ शकते. यामुळे केवळ पाण्याची बचत होत नाही, तर पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागतो. (फोटो सौजन्य :- @iStock)

बाथरूम आणि टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त

बाथरूम आणि टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त

बाथरूम साफ करताना किंवा टॉयलेट फ्लश करण्यासाठी AC चे पाणी वापरता येऊ शकते. या कामांसाठी पिण्यायोग्य पाण्याची गरज नसते. त्यामुळे हा एक पर्यावरणपूरक पर्याय ठरतो.

घराची साफसफाई करण्यासाठी वापरा

घराची साफसफाई करण्यासाठी वापरा

AC चे पाणी घरातील फरशी, गच्ची, बाल्कनी किंवा जिने धुण्यासाठी वापरता येते. रोज साफसफाईसाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. अशा वेळी हे पाणी साठवून वापरल्यास नळाच्या पाण्याची बचत होऊ शकते.याशिवाय दरवाजे, खिडक्या किंवा बाहेरील फरशी स्वच्छ करण्यासाठीही याचा उपयोग करता येतो.

वाहन धुण्यासाठी वापरा

वाहन धुण्यासाठी वापरा

दुचाकी, सायकल किंवा कारवरील धूळ काढण्यासाठी AC चे साठवलेले पाणी वापरता येते. वाहन धुताना मोठ्या प्रमाणात पाणी खर्च होते. त्यातील काही गरज AC च्या पाण्याने पूर्ण होऊ शकते.

AC मधून पाणी का बाहेर पडते?

AC मधून पाणी का बाहेर पडते?

AC खोलीतील उष्ण आणि दमट हवा थंड करताना त्यातील आर्द्रता (Moisture) कंडेन्सेशन प्रक्रियेद्वारे पाण्यात रूपांतरित होते. हेच पाणी ड्रेन पाइपद्वारे बाहेर पडते. त्यामुळे हे पाणी पावसाचे किंवा भूजलाचे नसून हवेतील आर्द्रतेपासून तयार झालेले असते. हे पाणी तुलनेने स्वच्छ दिसत असले तरी ते पिण्यासाठी किंवा स्वयंपाकासाठी योग्य नसते. कारण AC च्या कॉइल्स, पाइप्स किंवा ड्रेनमध्ये धूळ, बुरशी, धातूंचे सूक्ष्म कण किंवा इतर अशुद्धता मिसळू शकतात.

झाडांना पाणी देताना घ्या काळजी

झाडांना पाणी देताना घ्या काळजी

अनेकजण AC चे पाणी झाडांना घालतात. हे काही झाडांसाठी चालू शकते, मात्र नियमितपणे सर्वच झाडांना हे पाणी देणे योग्य नाही. कारण या पाण्यात आवश्यक खनिजे नसतात आणि त्याचा pH काही वेळा वेगळा असू शकतो.जर वापरायचे असेल तर AC चे पाणी साध्या पाण्यात मिसळून अधूनमधूनच वापरणे अधिक सुरक्षित ठरते.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा