Headlines

राणीच्या मनात काय? बोल बोल राणीच्या टीमसोबत गप्पा – bol bol rani marathi movie team mata katta interview


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बोल बोल राणी हा सिनेमा १७ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सई ताम्हणकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. ट्रेलरच्या प्रत्येक फ्रेममध्ये वाढणारा थरार, वेगवान घडामोडी आणि प्रत्येक क्षणात सईची बदलणारी छटा, अधिक गडद होत जाणारं रहस्य यामुळे हा ट्रेलर प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतोय. या चित्रपटात सई ताम्हणकर एका वेगळ्या व रहस्यमय भूमिकेत दिसत आहे. चित्रपटाची कथा तिच्या पात्राभोवती फिरत असल्याचं पाहायला मिळते. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमागचं सत्य नेमकं काय आहे? ती या रहस्याची बळी आहे की सूत्रधार? तिच्या प्रत्येक भावामागे आणि प्रत्येक संवादामागे अनेक प्रश्न दडलेले असल्यानं तिचं पात्र चित्रपटातील सर्वात मोठं कोडं ठरणार असल्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं सई ताम्हणकर, संभाजी ससाणे आणि दिग्दर्शक सिद्धार्थ विंचुरकर यांनी मटा कट्टावर हजेरी लावली. पाहा संपूर्ण मुलाखत…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत