Supriya Sule: आमचा पक्ष पूर्णपणे एकसंध आहे. आमचा एकही खासदार पक्षाविरोधात बोललेला नाही, असे स्पष्ट केले. दरम्यान, सुळे यांनी शनिवारी (दि. ११) सप्तशृंगी गडावर देवीचे दर्शन घेतले.

राज्यात ‘ऑपरेशन टायगर-३’, ‘ऑपरेशन तुतारी’ आणि संभाव्य पक्षांतरांच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले असताना सुळे यांनी शनिवारी (दि. ११) पक्षांतराच्या वावड्यांवर उपरोधिक टीका केली. ‘आता ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस काम करणार, असाही जोक आमच्या ग्रुपमध्ये फिरत आहे.’ असा टोमणाही त्यांनी विरोधकांना लगावला. त्याचवेळी ‘लोकप्रतिनिधींना कमोडिटी बनवण्याचा प्रकार लोकशाहीला शोभणारा नाही,’ असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी या अफवांमागील ‘सूत्रां’वरही टीका केली.
Shivsena UBT: ठाकरे गटाबाबत कल्लोळ! नगरसेवकफुटीचे पक्षाकडून खंडन; सर्व 15 नगरसेवक सोबतचा दावा
‘कर्जमाफीच्या घोषणा झाल्या; पण अंमलबजावणी झाली नाही. कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे. भूसंपादनग्रस्तांना न्याय मिळायलाच हवा,’ असे त्यांनी स्पष्ट केले. ‘ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलात, त्याच पक्षात पाच वर्षे राहिले पाहिजे. पक्ष बदलायचाच असेल, तर आधी राजीनामा द्यावा आणि पुन्हा जनतेचा कौल घ्यावा. जनतेने दिलेल्या मतांचा विश्वासघात होता कामा नये,’ असे त्या म्हणाल्या.
Supriya Sule | पार्थ पवारांचा साखरपुडा ठरला, आत्याबाई म्हणाल्या, ‘आता पोरांनी मनावर घेतलंय’
‘लवकरच गोड बातमी’
पवार कुटुंबातील लग्नसराईचा उल्लेख करताना खा. सुळे यांनी ‘आमच्या घरी सध्या लग्नाचे वातावरण आहे. युगेंद्र, जय, रेवती यांच्यानंतर आता पार्थ पवारच्या लग्नाची तयारी सुरू आहे. आणखी एक गोड बातमी लवकरच तुम्हाला कळेल,’ असे सांगत त्यांनी उपस्थितांची उत्सुकता वाढवली. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित करीत या प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
मंदिरांतील चोरी दुर्दैवी
अयोध्येपासून उज्जैनपर्यंत मंदिरांमध्ये भ्रष्टाचार, चोरी आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या घटना समोर येत आहेत. समाजाला मर्यादा आणि मूल्ये शिकविणाऱ्या मंदिरांनाच भ्रष्टाचाराचा विळखा पडणे दुर्दैवी आहे. या प्रकरणांवर सरकारने मौन बाळगू नये. दोषींवर कठोर कारवाई करून स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

