Headlines

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात PM नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, बिग बॅश क्रिकेट लीगचा पहिला सामना भारतात, कधी आणि कुठे होणार?


Big Bash League Match in Chennai : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना MCGच्या मैदानावर बिग बॅश क्रिकेट लीगबाबत घोषणा केलीय. पहिला सामन्याचे आयोजन हे भारतात केले जाणार आहे. हा सामना कधी आणि कुठे असणार जाणून घ्या.

PM Modi Big Bash League match in India (1)
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर असून इंडोनेशियातील यशस्वी भेटीनंतर 8 जुलैला ते थेट सिडनीला दाखल झाले आणि तिथून पुढे 10 जुलैला मेलबर्नला पोहोचले. या दौऱ्याचा सर्वात चर्चेत राहिलेला क्षण म्हणजे मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत घेतलेली संयुक्त पत्रकार परिषद. यावेळी मोदींनी क्रिकेटच्या मैदानावरून एक ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली.

ऑस्ट्रेलियाची जगप्रसिद्ध टी२० लीग ‘बिग बॅश लीग’ च्या १६ व्या पर्वाचा उद्घाटन सोहळा आणि पहिला सामना यावेळी ऑस्ट्रेलियाऐवजी भारतात होणार आहे. परदेशी टी२० लीगचा पहिला सामना पहिल्यांदाच भारतात होत असल्याने हा निर्णय दोन्ही देशांच्या क्रीडा सहकार्यातील मैलाचा दगड ठरणार आहे. हा विशेष सामना १२ डिसेंबर २०२६ रोजी चेन्नईच्या प्रसिद्ध एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये आयोजित केला जाईल. मैदानावर मेलबर्न रेनेगेड्स आणि पर्थ स्कॉर्चर्स हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने असणार आहेत. बीबीएल सहसा डिसेंबरच्या सुरुवातीला सुरू होते आणि जानेवारीत अंतिम सामन्याने संपते. पण यावेळी लीगची सुरुवातच भारतातून होत आहे.
Maharashtra TimesIND vs ENG 4th T20 : भारताचा सलग तिसरा पराभव, आयर्लंडनंतर इंग्लंडविरूद्धचीही मालिका गमावली, ब्रूक-साल्टची अर्धशतकी खेळी
हा सामना फक्त क्रिकेटचा सामना राहणार नाही. त्याच आठवड्यात भारतभर सुरू होणाऱ्या ‘ऑस्ट्रेलियन कल्चर फेस्टिव्हल’ चा तो मुख्य कार्यक्रम असेल. संगीत, खाद्यसंस्कृती, कला आणि खेळ यांचा संगम या महोत्सवात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे बीबीएलचा हा सामना दोन्ही देशांमधील लोकांमधील जवळीक वाढवण्याचे काम करेल.

Maharashtra TimesIND vs ENG : भारताने मालिका गमावली, श्रेयस अय्यरने कोणाला ठरवलं व्हिलन? सामन्यानंतर काय म्हणाला?
मेलबर्नच्या मैदानावरून बोलताना मोदींनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जुन्या क्रीडा नात्याचा उल्लेख केला. जेव्हा कधी पंतप्रधान अल्बानीज यांच्याशी भेट होते, तेव्हा क्रिकेट हा आमच्या गप्पांचा अविभाज्य भाग बनतो. काही वर्षांपूर्वी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आम्ही एकत्र वेळ घालवला होता आणि आज MCG च्या ऐतिहासिक मैदानावर उभे राहिल्यावर तशाच आठवणी जाग्या झाल्या. स्टीव्ह वॉ आणि लिसा स्थालेकर यांसारखे दिग्गज खेळाडू इथे उपस्थित असल्याने या क्षणाला अजूनच खास महत्त्व प्राप्त झाल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे.
Maharashtra TimesShreyas Iyer Captaincy : सलग पराभवांमुळे ट्रोल होणारा श्रेयस काही बोलला नाही, पण बहिणीने सगळ्यांचीच बोलती बंद केली
MCG वर येणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या मनात दोन गोष्टी एकत्र येतात. एक म्हणजे भारत-ऑस्ट्रेलिया लढतीतील थरार आणि दुसरी म्हणजे क्रिकेट हा केवळ स्पर्धा नसून दोन्ही राष्ट्रांना जोडणारा पूल आहे. आज इथे शेवटच्या चेंडूचा दबाव नाही, इथे आहे तो खेळाचा उत्सव, मैत्रीची उब आणि पुढच्या पिढीतील खेळाडूंना प्रेरणा देणारी सकारात्मक ऊर्जा, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा