Headlines

Pune Moshi Building Collapse Sister Sujata Shinde stuck under Debris Brother cries; ताईला सांगत होतो इथे काम नको करुस… बहीण ढिगाऱ्याखाली अडकली, भावाचा हंबरडा; मोशी इमारत दुर्घटनेनंतर उपस्थित हेलावले


Pune Moshi Building Collapse : ‘कचरा डेपोतील इमारतीत माझी बहीण अडकल्याचे समजताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली,’ अशा शब्दांत खेड तालुक्यातील विश्वास गवारे यांनी आपली व्यथा व्यक्त केली.

Pune Moshi Building Collapse Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : मोशी कचरा डेपोतील इमारत कोसळून कर्मचारी अडकल्याची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाइकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र, मुख्य प्रवेशद्वारावरच त्यांना थांबविल्याने अस्वस्थता अधिक वाढली. ‘कचरा डेपोतील इमारतीत माझी बहीण अडकल्याचे समजताच पायाखालची जमीनच सरकली,’ अशा शब्दांत खेड तालुक्यातील बहुळ येथील विश्वास गवारे यांनी आपली व्यथा व्यक्त केली.

काम करु नको, बहिणीला सांगितलेलं

मोशी येथील कचरा डेपोतील दुर्घटनेत हाउसकीपिंग कर्मचारी सुजाता शिंदे (वय ५०) या ढिगाऱ्याखाली अडकल्या होत्या. चार वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर गेल्या सात वर्षांपासून त्या डेपोत काम करून तीन मुलींचा सांभाळ करीत आहेत. गवारे म्हणाले, ‘कचरा डेपो धोकादायक असल्याने तेथे काम करू नको, असे मी बहिणीला अनेकदा सांगितले होते. मात्र, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तिच्याकडे पर्याय नव्हता. बुधवारी महामार्गावरून जाताना डेपोबाहेर रुग्णवाहिका आणि पोलिसांची गर्दी पाहिली. चौकशीनंतर बहीण इमारतीत अडकल्याचे समजले. अधिकाऱ्यांनी ती सुरक्षित असल्याचे सांगितले; पण तिच्याशी बोलू दिले नाही.’

मोशी येथे बचाव आणि मदतकार्यासाठी अभियंता आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे संयुक्त कार्य दल तैनात केले आहे. लष्कराची टीम राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पोलिस, अग्निशमन सेवा आणि इतर नागरी संस्थांशी समन्वय साधून सुरू असलेल्या बचाव प्रयत्नांना मदत करत आहे, असे पुण्याचे जनसंपर्क अधिकारी (संरक्षण) अंकुश चव्हाण यांनी सांगितले.
Maharashtra TimesEknath Khadse : महाजनांचा प्रभाव घटवण्यासाठी केंद्राची नवी चाल? तावडेंशी भेट, घरवापसीच्या चर्चांवर एकनाथ खडसे म्हणतात…

इमारत डोळ्यांसमोर जमीनदोस्त

चिंचवड येथील आनंदनगरमधील साहिल प्रताप हे कचरा वाहनावर मजूर आहेत. ते म्हणाले, ‘आमचे वाहन इमारतीजवळ उभे असतानाच कचऱ्याचा प्रचंड ढीग इमारतीवर कोसळला. इमारत डोळ्यांसमोर जमीनदोस्त झाली. आम्ही हादरलो आणि तातडीने बाहेर पडलो.’

सोमनाथ शेळके, सचिन दवडगाव, दादासाहेब आरडे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण, रणवीर सिंह, विजय सपकाळ यांना बचावकार्यादरम्यान सुखरूप बाहेर काढण्यात पथकाला यश आले. अशोक गुप्ता, मुनेंद्र कुमार, चंद्रशेखर सिंह, दिनेश सुतार, श्री बाला हे घटना घडल्यानंतर सुखरूप बाहेर पडले.

देशात El Nino चा इशारा असतानाही Maharashtra मध्ये मुसळधार पाऊस कसा? काय म्हणाला शेतकरी?

अचानक कचऱ्याचा डोंगर सरकला आणि काही कळायच्या आत इमारत कोसळली. आम्ही प्रचंड घाबरलो आणि जीव वाचवण्यासाठी तेथून बाहेर पडलो.
-गणेश शिंदे, कचरा वाहतूक करणारे मजूर
Maharashtra TimesHingoli Earthquake : हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के; दोन तासात चार वेळा धरणीकंपाची पहिलीच वेळ

कचऱ्याच्या डोंगरामुळे धोका निर्माण होऊ शकतो, याची कल्पना प्रशासनाला होती. वेळेत उपाययोजना केली असती, तर ही दुर्घटना घडली नसती. या घटनेला प्रशासनच जबाबदार आहे.
– विश्वास गवारे, सुजाता शिंदे यांचे बंधू

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा