Headlines

Malkapur News | मलकापूरचं ‘मंगलपूर’ नामकरण तूर्तास स्थगित; नगरपरिषदेचा मोठा निर्णय


मलकापूर  -मलकापूर शहराचे मंगलपूर असे नामकरण करण्याबाबतचा 25 जून रोजी ठराव करण्यात आला होता . मात्र याबाबत शहरातील  जनमताचा आदर करून  बुधवार 8 जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वांनुमते या ठरावाला स्थगिती देण्यात आली .

पुढील तीन महिने या ठरावावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असे प्रतिपादन नगराध्यक्षा रश्मी शंतनू कोठावळे यांनी विशेष सर्वसाधारण सभे प्रसंगी केले .

      मलकापूर शहराचे नामकरण मंगलपूर असे करणेबाबत मलकापूर नगर परिषदेत ठराव करण्यात आला होता .याबाबत जनमत आजमवल्यानंतर मलकापूर नगर परिषदेच्या वतीने विशेष सर्व साधारण सभेच आयोजन करण्यात आलं होतं .

नगराध्यक्षा रश्मी कोठावळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली . यावेळी मुख्याधिकारी चेतन माळी यांची प्रमुख उपस्थिती होती .



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत