मलकापूर -मलकापूर शहराचे मंगलपूर असे नामकरण करण्याबाबतचा 25 जून रोजी ठराव करण्यात आला होता . मात्र याबाबत शहरातील जनमताचा आदर करून बुधवार 8 जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वांनुमते या ठरावाला स्थगिती देण्यात आली .
पुढील तीन महिने या ठरावावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असे प्रतिपादन नगराध्यक्षा रश्मी शंतनू कोठावळे यांनी विशेष सर्वसाधारण सभे प्रसंगी केले .
मलकापूर शहराचे नामकरण मंगलपूर असे करणेबाबत मलकापूर नगर परिषदेत ठराव करण्यात आला होता .याबाबत जनमत आजमवल्यानंतर मलकापूर नगर परिषदेच्या वतीने विशेष सर्व साधारण सभेच आयोजन करण्यात आलं होतं .
नगराध्यक्षा रश्मी कोठावळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली . यावेळी मुख्याधिकारी चेतन माळी यांची प्रमुख उपस्थिती होती .
