Mumbai News : फूटपाथखालून जाणाऱ्या सेवा वाहिन्या, काही ठिकाणी बसवलेले पेव्हर ब्लॉक ही झाडांच्या पडझडीमागे काही कारणे आहेत. याशिवाय यंदा पावसात वाऱ्याचे प्रमाण अधिक असल्याने झाडांचे सर्वाधिक नुकसान झाले, असे मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.

‘वाऱ्याचे प्रमाण अधिक असल्याने झाडांचे सर्वाधिक नुकसान’
महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मंगळवारी महापालिका मुख्यालयात महापालिकेशी संबंधित विविध विषयांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, मुंबईत अनेक झाडे रस्त्यावर नसून, रस्त्याच्या बाजूला फूटपाथवर आहेत. फूटपाथखालून जाणाऱ्या सेवा वाहिन्या, काही ठिकाणी बसवलेले पेव्हर ब्लॉक ही काही कारणे झाडांच्या पडझडीमागे आहेत. याशिवाय यंदा पावसात वाऱ्याचे प्रमाण अधिक असल्याने झाडांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे भिडे यांनी सांगितले.
…म्हणून मुळांना धोका पोहोचतो
‘२०१८च्या वृक्षगणनेनुसार मुंबईत २९ लाख ७५ हजार झाडे आहेत. यापैकी रस्त्याच्या दुतर्फा दोन लाख झाडे आहेत. रस्त्यालगतची झाडे खूप धोकादायक असतात. झाडांलगत असलेले पाणी वाहून गटारात जाणे किंवा इतर वाहिन्या रस्त्याच्या खालून गेल्यानेही झाडांच्या मुळांना धोका पोहोचतो. रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जाते, काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविले जातात. अशा ठिकाणी असलेल्या झाडांच्या मुळांना पाणी पोहोचविणे गरजेचे असते. संबंधित झाडांची मुळे कुठपर्यंत पसरलेली असतील याचा अंदाज घेऊन तिथपर्यंत छिद्रे करून त्यावर जाळी लावून पाणी टाकता येईल का, याबाबत महानगरपालिकेचा विचार सुरू आहे. असा प्रयोग यापूर्वी मलबार हिल परिसरात करण्यात आला होता’, असे भिडे यांनी सांगितले.
Muskan Jain : प्लीज माझे प्रायव्हेट फोटो डिलीट कर, तरुणीची रडत विनवणी; ऑडिओ क्लीपने अख्खी केस पालटली, युगुलाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट
‘अनेक झाडे ५० ते ६० वर्षे जुनी आहेत. त्यांची मुळे खूप खोलवर गेली आहेत. यासाठी रस्ते बांधत असताना कोणती काळजी घ्यावी यासाठी आमच्या सुनिश्चित कार्यपद्धती आहेत. त्यासाठी तज्ज्ञांचे मत जाणून घेऊन त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. जमिनीखालून विविध यंत्रणांच्या वाहिनी गेलेल्या असतील तर कामे करतानाही योग्य ती काळजी घेतली जाईल’, असेही भिडे यांनी स्पष्ट केले.
Navnath waghmare On Sharad Pawar NCP | विनोद तावडे-जयंत पाटील यांच्या भेटीनंतर वाघमारेंचा निशाणा
झाडांच्या काळजीसाठी तज्ज्ञांची मदत घेणार
‘मुंबई विद्यापीठातील डॉ. संजय देशमुख यांच्यासारख्या काही तज्ज्ञांकडून माहिती घेऊन, तसेच आयआयटीकडूनही याबाबत उपाययोजना जाणून घेणार आहोत. जमिनीत खोलवर गेलेल्या झाडांच्या मुळांना पाणी पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. झाडांची शास्त्रोक्त छाटणी करण्यावरही भर देणार आहोत. रस्त्यालगतच्या दोन लाख झाडांपैकी एक लाख झाडांची यंदा महापालिकेकडून छाटणी केली आहे. यासोबतच या झाडांचे सर्वेक्षण करून जेथे छाटणीची गरज आहे तेथे ती केली जाईल. यासाठी सुनिश्चित कार्यपद्धती वापरण्यात येणार असून यासाठीही तज्ज्ञांचे मत घेतले जाणार आहे’, असे अश्विनी भिडे यांनी सांगितले.
Vasai Virar Rain : पाणी साचलंय, पण प्यायला नाही; वसई-विरारवासियांचे ‘पाऊस’हाल, चार्जिंग-वायफाय ठप्प, WFH करणाऱ्यांची कोंडी
वाऱ्याच्या वेगामुळेही पडझड
दरवर्षी पावसाळ्यात वारे वाहतात, मात्र यावर्षी गेल्या चार ते पाच दिवसांपासून ताशी ५० ते ७० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात झाडांचे खूप नुकसान झाल्याचे भिडे यांनी सांगितले. दरवर्षी वर्षभरात जेवढी झाडे पडतात त्याच्या ५० टक्के झाडे एका दिवसात पडली. २०२२मध्ये ६५५ झाडे पडली, २०२३मध्ये ६८७, २०२४मध्ये ६५३, २०२५मध्ये ८५५ झाडे, तर २०२६मध्ये ८३० झाडे पडली. ८३०पैकी ४८० झाडे खासगी क्षेत्रातील होती. पडलेल्या झाडांच्या मोबदल्यात कुठे आणि कोणती झाडे लावायची यासाठी अभ्यासकांची मते घेतली जातील, असे त्या म्हणाल्या.

