#JaswantSinghKhalra #Satluj #DiljitDosanjh #SatlujMovieBanपंजाबमधील सामाजिक कार्यकर्ते जसवंत सिंग खालरा यांचा जीवनपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येताच काही तासात हटवण्यात आलाय. विशेष म्हणजे सेन्सॉरनं या चित्रपटासाठी १२७ कट्स सुचवले होते. पण ओटीटीवर कोणताही कट न करता हा चित्रपट रिलीझ झाला आणि तिथूनच वाद सुरु झाला. त्यानंतर काही तासात हा चित्रपट बॅन करण्यात आलाय. पण अभिनेता दिलजीत दोसांज म्हणाला ऑनलाईन आलेली कोणतीही गोष्ट मिटत नाही, डाऊनलोड करून बघा, म्हणजेच दिलजीतने पायरेटेड सिनेमा बघण्याचा सल्ला दिलाय. असं नेमकं काय घडलंय? जसवंत सिंग खालरा यांचा जीवनपट समोर येऊ नये असं कोणाला वाटतंय? सगळं पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून.