Headlines

दाक्षिणात्य सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. सिनेविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री अभिनेत्री सावकार जानकी यांचं निधन झालं आहे. त्या ९४ वर्षांच्या होत्या.


चेन्नई: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री सावकार जानकी यांचं वृद्धापकाळामुळे निधन झालं. त्या ९४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनानं तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

तब्बल सात दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अभिनेत्री सावकार जानकी यांनी ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.

रेडिओत काम ते अभिनेत्री

सावकार जानकी यांचा जन्म १२ डिसेंबर १९३१ रोजी आंध्र प्रदेशातील राजमुंद्री इथं झाला. त्यांनी आपल्या कलाकारकिर्दीची सुरुवात ऑल इंडिया रेडिओवरून केली. १९५० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सावकार’ या तेलगू चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेलं. या पहिल्याच चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला, आणि या चित्रपटाच्या अफाट यशानंतर त्यांच्या नावासोबत ‘सावकार’ हे नाव कायमचं जोडलं गेलं. त्यानंतर त्यांनी तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषेतील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं.

एनटी रामा राव, एएनआर (अक्किनेनी नागेश्वर राव), एमजी रामचंद्रन (एमजीआर), आणि शिवाजी गणेशन यांसारख्या त्या काळातील बड्या नायकांसोबत सावकार जानकी यांनी अनेक यशस्वी चित्रपट केले.

वैविध्यपूर्ण भूमिका आणि अष्टपैलू अभिनय

जानकी यांनी केवळ सोप्या किंवा भावूक भूमिकाच केल्या नाहीत, तर त्यांनी गंभीर, कौटुंबिक, आणि आव्हानात्मक पात्रांनाही तितक्याच सहजतेनं जिवंत केलं. ‘पुधिया परवई’, ‘इरु कोडुगल’, ‘भागा पिरिविनाई’, आणि ‘मल्लम ना आडुजेन्मा’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांचं काम आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.दिग्दर्शक के. बालचंदर यांच्यासोबत त्यांनी काम केलेले चित्रपट त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील सुवर्णकाळ मानले जातात.

वय वाढल्यानंतरही त्यांचा अभिनयाचा प्रवास थांबला नाही. नंतरच्या काळात त्यांनी आजीच्या आणि महत्त्वाच्या कौटुंबिक भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणं सुरूच ठेवलेलं.

Maharashtra TimesArjun Rampal Marriage: अनेक वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये, दोन मुलांच्या जन्मानंतर बॉलिवूड अभिनेत्यानं गुपचूप उरकलं गर्लफ्रेंडसोबत लग्न
पुरस्कार आणि सन्मान

चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.भारतीय सिनेमातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना ‘पद्मश्री’ या सर्वोच्च नागरी पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं.तर तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश सरकारकडून त्यांना अनेकदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि जीवनगौरव पुरस्कार मिळाले.

सावकार जानकी यांच्या निधनाची बातमी समजताच दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, राजकीय नेते आणि चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे दुःख व्यक्त केले. पंतप्रधान, तसंट विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि चित्रपट जगतातील दिग्गजांनी त्यांना वाहिली आहे. सिनेविश्वातल्या एका युगाचा अंत झाल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली आहे.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत