Mumbai Asiatic Election 2026 : भाजपचे माजी खासदार विनय सहस्रबुद्धे विरुद्ध काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर अशा दोन गटांत ही लढत होती आणि कुणीही कितीही नाकारले तरी या संघर्षास गडद राजकीय रंग होताच.
मुंबई एशियाटिक निवडणूक २०२६(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांखालोखाल गेल्या काही दिवसांत गाजलेली निवडणूक म्हणून मुंबईतील ‘एशियाटिक सोसायटी’च्या निवडणुकीचा उल्लेख करायला हवा! या दोन्हींतील मोठा फरक म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ९० टक्क्यांच्या वर मतदान झाले आणि ‘एशियाटिक’च्या निवडणुकीत साधारण २० टक्क्यांच्या आसपास. बुद्धिजीवी वर्तुळातील अत्यंत प्रतिष्ठित अशा या संस्थेच्या मतदारांपैकी ८० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्कच बजावला नाही, हे दुर्लक्षण. आणि बंगाल व ‘एशियाटिक’च्या निवडणुकीत साम्य म्हणजे दोन्ही निवडणुकींदरम्यान झालेले आरोप-प्रत्यारोप आणि दोन्हीकडे आलेली उजव्या विचारसरणीची सत्ता.
भाजपचे माजी खासदार विनय सहस्रबुद्धे विरुद्ध काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर अशा दोन गटांत ही लढत होती आणि कुणीही कितीही नाकारले तरी या संघर्षास गडद राजकीय रंग होताच. आता निकालानंतर पुनःपुन्हा त्याच त्या पद्धतीचे आरोप-प्रत्यारोप चिवडत बसण्यापेक्षा पुढच्या वाटचालीकडे लक्ष देणे हिताचे. शहरे, राष्ट्र यांचा ‘विकास’ म्हणजे निव्वळ अगडबंब प्रकल्प, योजना, जीडीपी अशाच तराजूंमध्ये मोजता येत नाही. ‘शहाणे करुनि सोडावे सकळजन’ असा वसा घेतलेल्या ज्या संस्था असतात त्यांनाही वर्धिष्णु, उज्ज्वल भवितव्य असावे लागते. प्राच्यविद्या, इतिहास, संस्कृती व इतर अनेक विषयांची दुर्मीळ हस्तलिखिते, पोथ्या, ग्रंथ असा अमूल्य ठेवा असलेल्या व जवळपास दोन शतकांचा वैभवशाली वारसा असलेल्या ‘एशियाटिक’चा समावेश अशा संस्थांमध्ये होतो.
मात्र गेली काही वर्षे ही संस्था चर्चेत आहे ती तेथील समस्या, कर्मचाऱ्यांचे न होणारे पगार असल्या गोष्टींसाठी. समाज म्हणून लाज वाटावी, अशी ही स्थिती. सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील ‘एशियाटिक टुमारो’च्या विजयी चमूला या गोष्टींना तातडीने हात घालावा लागेल. संस्था अधिकाधिक लोकाभिमुख करावी लागेल. सोबतच महत्त्वाचे पथ्य पाळावे लागेल ते वैचारिक अस्पृश्यता दूर ठेवण्याचे. कारभार हाकताना या संस्थेवर कुठल्याही विशिष्ट रंगाचा शिक्का बसणार नाही, याची काळजी त्यांनी घ्यायला हवी. केवळ एकाच विशिष्ट विचारवृत्तीचे पीठ अशी संस्थेची प्रतिमा होणे मुळीच हितावह नाही. ज्ञानाचे, अभ्यासाचे, विचारांचे खुले वारे मुक्तपणे वाहू देणारी संस्था अशी उद्याच्या ‘एशियाटिक’ची ओळख व्हावी. असे होणे सद्यकाळात दुर्मीळ… तरीही आशा ठेवायला हवी!
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा