Headlines

Severe flooding in pune and maval impact on schools latest update from district officials; पुण्याला पावसाने झोडपलं, दिलासा कधी? शाळा उद्या सुरू राहणार? जिल्हाधिकाऱ्यांची माहिती; मावळात आभाळ फाटलं


पुणे: पुणे शहरासह मावळ तालु्क्यात आज पावसाने थैमान घातलं असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. लोणावळ्यात इतिहासातील सर्वाधिक पाऊस झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. हवामान खात्याने रेड अलर्ट दिल्याने आज जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र पुण्याला उद्या ऑरेंज अर्लट आहे. त्यानंतर पाऊस कमी होईल. एल निनोमुळे पुढे पावसाची शक्यता नसल्यामुळे पाण्याचा जास्त विसर्ग करणार नाही. तसंच पुणे शहरातील शाळा सुरू राहतील. मात्र घाट परिसरातील गावातील शाळा बंद राहतील, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र डुडी म्हणाले की, “देहू आणि आळंदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे देहू आणि आळंदीला जाणे टाळा. पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पुणे महापालिका हद्द किंवा त्यापुढे सहभागी व्हावे. इंद्रायणी नदीतून ८ हजार क्यूसेक ; पवना नदीतून १० हजार क्युसेक विसर्ग सुरू. पाऊस सुरू राहिला तर आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी खडकवासला धरणातून १० क्यूसेक विसर्ग करावा लागेल.”

दरम्यान, “जिल्ह्यातील विविध घटनांमध्ये वीस लोक जखमी झाले आहेत. दोन दिवसांत पाच जणांचा मृत्यू झाला असून रेड किंवा ऑरेंज अलर्ट असेल तर जिल्ह्यातील किल्ले आणि पर्यटन स्थळ बंद राहतील. जिल्ह्यात २२ भूस्लखन, दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तसंच जिल्ह्यातील नऊ रस्ते बंद करण्यात आले आहेत. दोन दिवसात २०० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस कोसळला आहे,” अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

लोणावळ्यासह मावळात आभाळ फाटलं, संपूर्ण मावळात जलप्रलय

लोणावळ्यासह मावळातील सर्वच रस्ते, अनेक पूल पाण्याखाली गेले संपूर्ण मावळाचा संपर्क तुटला आहे. महाराष्ट्रासह देशाची दळणवळण गंगा संबोधल्या जाणाऱ्या मुंबई पुणे द्रुतगती व जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहू लागल्याने वाहतूक ठप्प होती, तसेच काही वाहने वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिसिंग लिंक मार्गावर पावसाच्या पाण्यामुळे आलेला मोठ्या प्रमाणातील मलबा, सिमेंटा खांब, एक टन वजनाचा एक भला मोठा दगड कोसळल्याने मिसिंग लिंकचीही वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई पुणे लोहमार्गावर खंडाळा घाटात सहा ते सात ठिकाणी लोहमार्गावर दरडी कोसळण्याच्या घटनांनी रेल्वे वाहतूकही ठप्प झाल्याने मुंबई पुणे लोकलसह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती.

मळवली जवळील व विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाटण तालुक्यातील एक घर दरडीच्या खाली गडप झाल्याने या घरातील तिघांचा मृत्यू झाला आहे. लोणावळ्यात मागील २४ तासांत ६२५ तर पवना धरण पाणलोट ३४२ क्षेत्रात मिलीमीटर पावसाची नोंद, तर मावळातील सर्वच जलाशयांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली असून, काही धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने त्यांच्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. लोणावळ्यातील टाटाचे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातील पाण्याचा प्रवाह इंद्रायणी नदीच्या पात्रात आल्याने लोणावळ्यात इंद्रायणी नदी काठी असलेल्या हुडको कॉलनी परिसराला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून, येथील अनेक घरे १० ते १२ फुटांपर्यंत पाण्यात गेली आहे.

मावळ तालुक्यातील बहुतांश रस्ते, पुल पाण्याखाली गेल्याने तालुक्याचा संपर्क तुटला. सर्व नद्या,नाले व ओढ्यांना महापूर आला आहे. तालुक्यातील संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. पाटण गावासह धालेवाडी, लोहगड, लोणावळ्यातील हनुमान टेकडी जवळ, पवन मावळातील जवण गावच्या हद्दीसह इतर काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

भांगरवाडी, नांगरगाव, वलवण भागात ५ ते ७ फुटांपर्यंत पाण्याची पातळी वाढली होती. अनेक घरांमध्ये, सोसायटी व बंगल्यात पाणी घुसले तर लोणावळा ग्रामीण परिसरातील कुसगाव बुद्रुक हद्दीतील दत्तवाडी, यशवंत नगर, भैरवनाथ नगर, कुसगाववाडी, ओंढे रोड, क्रॉंक्रीट इंडिया, वेताळवाडी, डोंगरगाव याभागात ४ ते ५ फुटांपर्यंत पाणी साचल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने अनेकांच्या संसार पाण्यात गेले आहेत.

विशेषतः मळवली परिसराला समुद्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या परिसरातील काही बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी गेले होते. ठिक ठिकाणी पुराच्या पाण्यात अडकलेल्या रहिवाशांना, पर्यटकांना लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र आणि मावळ वन्यजीव संरक्षण संस्थेच्या आपत्कालीन पथकाने सोमवारी पहाटेपासूनच जिवाची पर्वा न करता सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत