Headlines

एन. रघुरामन यांचा कॉलम:देखाव्याच्या काळात पैसे वाचवणे कौशल्य




येत्या 28 ऑगस्टला माझ्या कुटुंबात एक लग्न आहे. ठिकाण आहे चेन्नईपासून 300 किमी दूर कुंभकोणम. रेल्वेचे तिकीट आरक्षित करता यावे यासाठी सर्व नातेवाइकांना दोन महिने आधीच सांगण्यात आले आहे. पण गोष्ट तेव्हा बिघडू लागली जेव्हा मोठा वेळ आणि बजेटचे गणित एकमेकांशी भिडू लागले. मुंबईपासून तिथपर्यंतचा ट्रेनचा प्रवास 35 तासांचा आहे. वृद्धांसाठी एवढा प्रवास कष्टापेक्षा कमी नाही. त्यामुळे, बहुतेकांनी जवळच्या विमानतळासाठी म्हणजेच तिरुचिरापल्लीसाठी फ्लाइट घेण्याचे ठरवले. पण खरा ड्रामा तेव्हा सुरू झाला जेव्हा फॅमिली व्हॉट्सॲप ग्रुपवर लग्नाची पत्रिका आली. पत्रिका येताच अभिनंदनाच्या संदेशांऐवजी ग्रुपवर या गोष्टीची डोकेदुखी सुरू झाली की मुंबई ते तिरुचिरापल्लीचे तिकीट ~16,000 रुपयांचे आहे. आता जरा पाहुण्यांचा पूर्ण खर्च समजून घ्या- सोळा हजारांची फ्लाइट, विमानतळापासून लग्नाच्या ठिकाणापर्यंत 2,500 ची टॅक्सी, एखाद्या बजेट हॉटेलमध्ये दोन दिवस राहण्याचे चार हजार व 2 हजार किरकोळ खर्च. यात आहेर वेगळा. परिणाम असा झाला की या खर्चाने लग्नाच्या आनंदाला दाबून टाकले. ग्रुपवर बहुतांश नातेवाइकांनी आतापर्यंत येण्यास होकार दिलेला नाही. आज मध्यमवर्गीयांसाठी लग्न अटेंड करण्याचा सरासरी खर्च एवढा वाढला आहे की तो त्यांना उपस्थित राहण्यापासून रोखत आहे. पाहिले तर भारतीय समाजात लग्ने ही सामाजिक जबाबदारीची मोठी करन्सी आहेत. जर तुम्ही कुटुंबातील लग्नाला जात नाही, तर तुम्ही वृद्धांच्या त्या ‘सोशल बॉयकॉट’ची जोखीम घेत असता जे 6-6 महिने तुमच्याशी बोलत नाहीत. नातेवाइकांच्या डोक्यात वहीखाते चालत असते, ज्यात कुणी कुणाच्या लग्नात हजेरी लावली व कुणी किती आहेर दिला, याचा हिशोब अनेक दशक ठेवला जातो. आज अडचण अशी की यजमान इन्स्टाग्रामवर परफेक्ट दिसणाऱ्या ‘फेयरीटेल वेडिंग’च्या मागे धावत आहेत, पण किंमत पाहुण्यांना मोजावी लागत आहे. बदनामीच्या याच भीतीने अनेक वृद्ध थकवणाऱ्या मार्गांनी प्रवास करण्यास भाग पडले आहेत, जेणेकरून ते गॉसिपचा विषय बनणार नाहीत. मॅनेजमेंट टिप: मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध, सोशल मीडियाच्या फोटोंचा भाग बनण्यासाठी बजेट बिघडवू नका. देखाव्याच्या काळात खिसा व मानसिक शांतता वाचवणे हेच मोठे ॲसेट मॅनेजमेंट आहे. लग्नात स्वतः जाण्याऐवजी भेटवस्तू पाठवून द्या, जी नवदाम्पत्याच्या उपयोगाला येईल व तुमचा स्वाभिमान सुरक्षित ठेवेल.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत