मध्यरात्री सव्वा-दीड वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. ऑपरेशन टायगर हे सुरुच राहणार या एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. शुभांगी पाटील यांचा शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश करणार होत्या; मात्र एकनाथ शिंदे यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला. त्यानंतर हा कार्यक्रम मध्यरात्री सव्वा-दीडच्या सुमारास पार पडला. उपमुख्यमंत्री उपस्थित नसल्यामुळे, त्यांचे सुपुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुभांगी पाटील यांचा पक्षात प्रवेश करून घेतला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली गळती थांबत नसल्याच दिसतंय. शुभांगी पाटील या नेमक्या कोण आहेत, त्यांच्या जाण्यानं ठाकरेंना धक्का कसा बसलाय तेच या व्हिडिओतून समजून घेऊ..