Mira Bhayandar Former Deputy Nagaradhyaksha Ashok Patil Son Rahul Patil Died Falling Coconut Tree; बाईकमध्ये पेट्रोल भरायला जाताना नारळाचं झाड कोसळलं, मुंबईतल्या विहाननंतर आता मीरा-भाईंदरच्या माजी उपनगराध्यक्षाच्या लेकाचा करुण अंत
Mira Bhayandar Former Deputy Nagaradhyaksha Ashok Patil Son Rahul Patil Died Falling Coconut Tree; बाईकमध्ये पेट्रोल भरायला जाताना नारळाचं झाड कोसळलं, मुंबईतल्या विहाननंतर आता मीरा-भाईंदरच्या माजी उपनगराध्यक्षाच्या लेकाचा करुण अंत
Mira Bhayandar Former Deputy Nagaradhyaksha Son Rahul Patil Dies : मीरा-भाईंदरमधील राई गावात मुसळधार पावसादरम्यान धावत्या दुचाकीवर नारळाचे झाड कोसळून गंभीर जखमी झालेल्या 33 वर्षीय राहुल पाटील याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मीरा भाईंदर राहुल पाटील झाड कोसळून मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
भाविक पाटील, मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये बुधवारी 1 जुलै रोजी झाड कोसळून एका दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान आज शुक्रवारी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राहुल पाटील (वय 33) असं मृत तरुणाचं नाव असून तो मिरा-भाईंदरचे माजी उपनगराध्यक्ष अशोक पाटील यांचा तो मुलगा होता. भाईंदरच्या मूर्धा गावात राहुल त्याच्या कुटुंबीयांसोबत वास्तव्यास होता. तो बुधवारी 1 जुलै रोजी सकाळी मुर्धाहून राई गावाच्या दिशेला दुचाकी वाहनात इंधन भरण्यासाठी जात होता. यावेळी रस्त्याच्या कडेला असलेलं एक नारळाचं झाड पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे राहुलच्या अंगावर कोसळलं. यात राहुल गंभीर जखमी झाला.
उपचारादरम्यान राहुलचा दुर्दैवी मृत्यू
अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. यादरम्यान काल गुरुवारी राहुलची प्रकृती मानेला गंभीर दुखापत झाल्यामुळे अधिक खालावली होती. दरम्यान, आज शुक्रवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर शहरातील धोकादायक झाडांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी देखील रस्त्यालगत असणारी धोकादायक झाडे वाहनांवर कोसळल्याची घटना घडली होती. राहुलच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे. या घटनेवर संपूर्ण शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. Solapur Crime : लेकरांना जेवत्या ताटावरुन उठवलं, मुलांना झोपवायला नेते म्हणून गेली, बायको पुन्हा परतलीच नाही; घराजवळील दृश्य पाहून सगळ्यांचाच हंबरडा मागील आठवड्यापासून शहरात रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू असून अद्याप अतिवृष्टी झालेली नाही. तरीही विविध भागांत झाडे कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. धोकादायक झाडांचे वेळेत सर्वेक्षण व छाटणी न झाल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. झाड कोसळून एका तरुणाचा बळी गेल्याने महापालिकेच्या कार्यपद्धतीविरोधात संताप व्यक्त केला जात असून धोकादायक झाडांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दोन दिवसांपूर्वी विहानचा मृत्यू
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी चेंबूरमधील ११ वी गल्लीतील हेरिटेज हाइट्स आणि रागिणी या दोन इमारतींच्या बाहेर असलेला एक पिंपळाचं झाड कोसळलं आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या स्कूल बसवर पडलं. महिनाअखेर असल्यानं अर्ध्या दिवसानं सुटलेल्या युनिव्हर्सल हायस्कूलच्या 14 मुलांना घेऊन ही बस निघाली होती. त्यापैकी दोन मुले उतरल्यावर ही बस 11व्या रस्त्यावरील एका विद्यार्थ्याला उतरवण्यासाठी थांबली असताना, त्याचवेळी हे झाड कोसळलं आणि या दुर्घटनेत 11 वर्षांच्या विहानचा हृदयद्रावक अंत झाला. Mumbai Local News: मुंबई लोकलमध्ये गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी सरकारकडून महत्त्वाच्या उपाययोजना; महिला डब्यासाठी कोणता निर्णय घेतला? या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विहान श्रीवास्तव या 11 वर्षांच्या मुलाच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. ‘विहानची आई जुही श्रीवास्तव ही घटना घडली त्यावेळी ऑफिसमध्येच होत्या. अचानक त्यांना फोन आला आणि त्यांना धक्काच बसला. आम्हीही हातातील सर्व कामे टाकून त्यांच्यासोबत रुग्णालयात धाव घेतली’, असे त्यांचे सहकारी बी. बी. कर्णा यांनी सांगितलं.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा