Chhatrapati Sambhajinagar FDA Action: परवाना निलंबित करण्यात आलेल्या रेस्टॉरंटमध्ये रंगाचे डब्बे, रंगाचा वापरकरून तयार करण्यात आलेली ग्रेव्ही तपासण्यात आली.

अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काढलेल्या आदेशानुसार या विभागातर्फे राज्यभर विविध हॉटेल्सवर कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर शहरातदेखील कारवाई करण्यात आली. याबद्दल अन्न औषध प्रशासन विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, ३० जूनपासून शहरातील विविध हॉटेल्सची तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यात गजानन महाराज मंदिर रस्त्यावरील यल्ला-यल्ला रेस्टॉरंट आणि इटखेडा येथील ‘आईच्या गावात’ या रेस्टॉरंटमध्ये अनियमितता आढळली.
Chandrakant Khaire | सचिन अहिरांचा शिवसेनेत प्रवेश, चंद्रकांत खैरेंनी गद्दार म्हणत चांगलंच सुनावलं
यल्ला यल्ला रेस्टॉरंटमध्ये कृत्रिम रंगांचा वापर बटर चिकन, पनीर ग्रीन, हरियाली कबाब, चिकन लॉलीपॉप या डिशमध्ये करण्यात येत असल्याचे दिसून आले. सर्व प्रकारच्या तयार रस्स्शांमध्ये (ग्रेव्ही) रंगाचा वापर करण्यात आला होता. या ठिकाणी रंगाचे डबे जप्त करून ते नष्ट करण्यात आले. स्वयंपाकघरात अन्नपदार्थ तयार करण्याच्या जागी अस्वच्छता, बुरशी, काळे डाग असलेल्या भाज्या, उघड्यावर ठेवलेली ग्रेव्ही, उघड्यावर ठेवलेले कच्चे अन्नपदार्थ दिसून आले. पिण्याचे पाणी विनामूल्य उपलब्ध आहे हा फलक दिसून आला नाही.
Chhatrapati Sambhajinagar Crime : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीला दुचाकी आडवी लावली, छत्रपती संभाजीनगरमध्ये पहाटेच्या अंधारात संतापजनक प्रकार
आईच्या गावात या रेस्टॉरंटमध्ये स्वयंपाकघरात बुरशी आलेले अन्नपदार्थ, बटरच्या जागी प्रोफेशनल फॅट स्प्रेडचा वापर होत असल्याचे दिसून आले. त्याचा वापर करून लोकांना बटर तंदूर, बटर रोटी, बटर नान असे पदार्थ दिले जात होते. पदार्थ साठवण्यासाठी प्लास्टिकचा ड्रम वापरण्यात येत होता. कच्चा माल असलेले अन्न पदार्थ आणि कचरा पेटी एकाच ठिकाणी होते. या रेस्टॉरंटमध्येही रंगाचा वापर दिसून आला. पिण्याचे पामी विनामूल्य उपलब्ध आहे असा फलक दिसून आला नाही.
विभागाचे सह आयुक्त श्री. रा. करकळे, सहायक आयुक्त द. वि. पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी व. ला. रोडे, कि. ल. झाडे यांनी या संदर्भातील कारवाई केली.
ज्यूस सेंटरवर कारवाई…
अन्न, औषध प्रशासनातर्फे गुरुवारी शहरातील एका ज्यूस सेंटरची तपासणी केली. अधिकारीसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, प्रशांत अजिंठेकर, फरीद सिद्दीकी, कीर्तिका झाडे यांनी लकी ज्युस सेंटर, पार्किंग समोर, पैठण गेट, या पेढीची तपासणी केली. येथे विविध त्रुटी आढळून आल्या. पेढीमध्ये पास्चुराइज्ड होमोजनाइज्ड टोनड दूध व अल्फान्सो मैंगो पल्प या अन्नपदार्थचा मुदतबाह्य साठा ज्यूस तयार करण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. सदर साठा नष्ट करण्यात आला आहे.

