Headlines

Pune Panshet Bridge Closed for Transportation Citizens of 28 Villages Inconvenienced; 68 वर्ष जूना पानशेत पूल वाहतुकीस बंद, शहरातील तब्बल 28 गावांसमोर मोठा पेच, ऐन पावसाळ्यात पुणेकरांचे हाल; कधी सुरु होणार?


Panshet Bridge Closed to Traffic : ‘पानशेत येथील पूल धोकादायक झाला आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. पूल बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्याने हा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे’, असं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी म्हटलं आहे.

Panshet Bridge Closed to Traffic
68 वर्ष जूना पानशेत पूल वाहतुकीस बंद(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पानशेत-पुणे मार्गावरील पानशेत वसाहतीजवळील सांडव्यावरील मुख्य पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. यामुळे राजगड (वेल्हे), मुळशी, हवेली तालुक्यातील सुमारे २८ गावांतील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पूल बंद केल्याने ऐन पावसाळ्यात नागरिकांचे हाल होऊ लागले असून, शाळा, कॉलेज, बँका, सरकारी कार्यालयांसह रुग्णालयात जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

धोकादायक पूल कोसळून काही जणांचा मृत्यू

गेल्या वर्षी पावसाळ्यात मावळ तालुक्यातील कुंडमळ्याचा धोकादायक पूल कोसळून काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्ह्यातील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ते पूल पाडण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग; तसेच जिल्हा परिषदांच्या अखत्यारित येणाऱ्या पुलांचे ऑडिट करण्यात आले. त्यानुसार, जिल्ह्यातील अनेक छोटे-मोठे पूल धोकादायक; तसेच दुरुस्तीसाठी असल्याचे आढळून आले. त्यानुसार धोकादायक पूल पाडण्यापूर्वी ते वाहतुकीस बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
Maharashtra TimesAshadhi Ekadashi 2026 : विठूमाऊलीच्या भेटीसाठी वारकऱ्यांना प्रशासनाकडून मोठं गिफ्ट, मध्य रेल्वेच्या 54 विशेष गाड्या, कधीपासून अन् कोणत्या गाड्या सुरु होणार?

पूल ६८ वर्षांचा

पानशेत धरणातून विसर्ग बंद आहे. पूल बंद असल्याने वाहनचालक धोका पत्करून पुलाखालून सांडव्याच्या प्रवाहातून प्रवास करीत आहेत. धरणातून पाणी सोडल्यास हा प्रवास जीवघेणा ठरू शकतो. हा पूल ६८ वर्षांचा असून, तो धोकादायक झाल्याने बंद केला आहे. नवीन ७७ मीटर लांबीचा पूल बांधण्यासाठी प्रस्ताव ‘नाबार्ड’कडे पाठविला आहे. मात्र, बांधकाम पूर्ण होईपर्यंत पूल बंद राहणार आहे.

परिसरातील गावांसाठी महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असल्याने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिल्याशिवाय पूल बंद करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे; तसेच ‘अवजड वाहने आणि माती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर निर्बंध घालावेत. स्थानिकांच्या वाहतुकीसाठी पूल सुरू ठेवावा,’ अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
Maharashtra TimesPune Weather Forecast: पुण्यात दमदार पावसाची हजेरी, पुढील दोन दिवस आणखी जोर वाढणार, IMD कडून अलर्ट जारी

वाहतुकीवर परिणाम

पूल बंद झाल्याने पानशेत-वेल्हे भागातून लवासा-वरसगावकडे आणि पुण्याकडे जाणारी वाहने कुरण खुर्द, खानापूर, गोऱ्हे, खडकवासला धरणमार्गे कुडजे, मांडवी डावजे निळकंठेश्वर रस्ता मार्गे वळवण्यात आली आहेत. लवासा-वरसगाव धरणाकडून पानशेतकडे जाणारी वाहने निळकंठेश्वर रस्ता, डावजे, कुडजे – खडकवासला धरणमार्गे वळवण्यात आली आहेत. यामुळे सुमारे ९० किलोमीटरचा फेरा पडत आहे, याकडे नागरिकांनी लक्ष वेधले.

दृष्टिक्षेपात

बंद केलेला पूल ६८ वर्षे जूना

नवीन ७७ मीटर लांबीचा पूल बांधणार

पूल बांधण्यासाठी ‘नाबार्ड’कडे प्रस्ताव

२८ गावांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा