Football World Cup trophy price : वर्ल्ड कप फुटबॉलमधील विजेतेपदाचा झळाळता सोन्याचा करंडक उंचावण्यासाठी सध्या स्पर्धा सुरू आहे. चार वर्षांत सोन्यांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे या करंडकाची किंमतही दुप्पट झाली आहे. या करंडकाचे सध्याचे मूल्य ७ लाख १३ हजार डॉलर म्हणजे आपले किती जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : जागतिक फुटबॉलमध्ये सर्वोत्तम असलेल्या देशाच्या संघाला देण्यात येणारा हा करंडक १८ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आला असून त्याचे वजन ६ किलो १७५ ग्रॅम आहे. त्यात ४ किलो ९३० ग्रॅम शुद्ध सोने असते. कतारमधील २०२२ची स्पर्धा झाल्यापासून जगभरात संघर्ष वाढला आहे. त्यामुळे सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहेत. त्याच्यामुळे या करंडकाचीही किंमत वाढली आहे.
काही कालावधीपासून सोन्याच्या भावाचा वाढणारा वेग कमी झाला आहे, पण किंमत सातत्याने वाढत असल्यामुळे त्याचे मूल्य अजूनही जास्त आहे, याकडे एलएसईजी मेटल्स रिसर्चचे प्रमुख विश्लेषक देबाजित साहा यांनी लक्ष वेधले. वर्ल्ड कप उंचावणाऱ्या संघासाठी या विजेतेपदाचे मोल अमूल्य असते. त्याबाबत वाद नाही. तो विजेतेपदाचा करंडक कितीही कमी किंमतीचा असला तरी तो जिंकण्यासाठी प्रयत्न होतीलच. मात्र या करंडकातील मोठ्या प्रमाणातील सोने या सर्वांना भावणाऱ्या धातूचे मूल्य काही वर्षात किती वाढले याची आठवण करून देते, याकडेही साहा यांनी लक्ष वेधले आहे. अर्जेटिनाने २०२२मध्ये वर्ल्ड कप उंचावला होता. त्यावेळी त्याचे मूल्य २ लाख ७७ हजार डॉलर (सध्याच्या विनिमय दरानुसार २ कोटी ६१ लाख ३३ हजार ४८० रुपये) होते. १९७४मध्ये हा करंडक पहिल्यांदा तयार झाला, त्यावेळी त्याची किंमत तेव्हा २५ हजार डॉलर होती. Lionel Messi : मेस्सीने रचला इतिहास! फिफा वर्ल्ड कपमध्ये असा विक्रम करणारा जगातला एकमेव खेळाडू वर्ल्ड कप फुटबॉलमधील विजेतेपदाचा करंडक सोडल्यास अन्य कोणत्याही स्पर्धेतील करंडक सोन्याचा नसतो. त्यामुळेही याचे महत्त्व वाढते. यूएफा चॅम्पियन्स लीग तसेच युरोपा लीग हे चांदीपासून घडवले जातात. त्याचे मूल्य अनुक्रमे १६ हजार ९५० डॉलर आणि २२ हजार ६०० डॉलर आहे. अमेरिकेतील स्पर्धा लक्षात घेतल्यास इंडियानापोलिस ५०० ऑटो रेसमधील विजेत्यास देण्यात येणारा करंडक सर्वाधिक किंमतीचा तसेच सर्वाधिक वजनदार असतो. त्याची उंची १.६२ मीटर असते. तो ६९ किलो चांदीपासून घडवला जातो. त्याची किंमत सुमारे १ लाख ५६ हजार डॉलर आहे. FIFA World Cup 2026 : फिफा वर्ल्ड कप 2026चा थरार, दहा दिवसांनंतर स्पर्धा वाढली; सर्वात सशक्त दावेदार कोणता संघ? सखोल विश्लेषण दरम्यान, प्रीकनेस स्टेक्स अश्वशर्यतीतील विजेत्यास देण्यात येणारा वूडलॉन वेसचे मूल्य २४ हजार ८६० डॉलर आहे तर सुपर बटल स्पर्धेतील विजेत्यास देण्यात येत असलेल्या व्हिन्स लोम्बार्डी करंडकाची किंमत ७ हजार २३० डॉलर आहे. त्यात ३ किलो २०० ग्रॅम चांदी असते.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा