Headlines

Kansas flash floods 33 years old Indian IT professional Venkatesh Doppalapudi dies as car gets swept away Crime News; हॅलो, इथे एक गाडी बुडतेय, त्यात एक माणूसही आहे; फोन येताच यंत्रणांची धावाधाव, मुसळधार पावसाने आयटी कर्मचाऱ्याचा जीव घेतला


Kansas flash floods : व्यंकटेश ह्युस्टनहून उत्तरेकडे गाडी चालवत असताना दक्षिण-मध्य कॅन्ससमध्ये मुसळधार वादळामुळे सहा इंचांपेक्षा जास्त पाऊस झाला. या पावसामुळे अचानक पूर आला

kansas flash floods Venkatesh Doppalapudi Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वॉशिंग्टन : अमेरिकेतील कॅन्सस राज्यामध्ये आलेल्या भीषण पुरात गाडी वाहून गेल्याने एका ३३ वर्षीय भारतीय आयटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनाने याबाबत माहिती दिली. व्यंकटेश डोप्पलापुडी असे या मृत तरुणाचे नाव असून, तो भारतीय नागरिक होता. व्यंकटेशकडे ‘एच-वन बी’ व्हिसा होता आणि तो नेब्रास्का येथील ओमाहा येथे राहत होता.

मुसळधार पावसामुळे पूर

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी व्यंकटेश ह्युस्टनहून उत्तरेकडे गाडी चालवत येत होता. याच दरम्यान दक्षिण-मध्य कॅन्ससमध्ये मुसळधार वादळामुळे सहा इंचांपेक्षा जास्त पाऊस झाला. या पावसामुळे तिथे अचानक पूर आला. व्यंकटेशची गाडी या पुरात अडकली.

प्रत्यक्षदर्शींनी प्रशासनाला कळवलं

एका पुलाजवळ गाडी पाण्यात बुडताना आणि वाहन चालक आतच अडकलेला असल्याचे पाहिल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी संबंधित अधिकाऱ्यांना याची सूचना दिली, असे वृत्त ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. समर काउंटी शेरीफ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, कॅन्ससमधील वेलिंग्टनजवळील साउथ ऑलिव्हर रोडच्या ६०० ब्लॉकजवळ एका पुलापाशी कार पाण्यात बुडाली.
Maharashtra TimesAjinkya Naik : ना देवरा ना अहिर; 2029 मध्ये वरळीतील लोकप्रिय चेहरा दक्षिण मुंबईतून NDA चा लोकसभा उमेदवार? सोशल मीडियावर चर्चांना पेव

अखेर बॉडीच सापडली

पुराच्या प्रवाहाचा वेग प्रचंड असल्याने सुरुवातीला बचाव पथकांना पाण्यात उतरणे शक्य झाले नाही; अखेरीस, विविध यंत्रणांनी केलेल्या व्यापक शोध मोहिमेनंतर दुसऱ्या दिवशी त्याचे शव बाहेर काढण्यात आले.

ह्युस्टन येथील भारताच्या वाणिज्य दूतावासाने या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवून असल्याचे सांगितले आहे. “कॅन्ससमध्ये अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे आंध्र प्रदेशातील व्यंकटेश डोप्पलापुडी या भारतीय विद्यार्थ्याचा झालेला दुर्दैवी मृत्यू अत्यंत वेदनादायी आहे” असे ह्युस्टन येथील भारताच्या वाणिज्य दूतावासाने म्हटले आहे.

Vikram Pachpute | मुद्दा सर्पदंशाचा, विक्रम पाचपुतेंकडून राज ठाकरेंला बिनविषारी आणि फुसका साप उल्लेख

“या कठीण प्रसंगी वाणिज्य दूतावास त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि मित्र परिवाराच्या दुःखात सहभागी असून त्यांना मनापासून संवेदना व्यक्त करत आहे. वाणिज्य दूतावास त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि निकटवर्तीयांच्या संपर्कात असून, शक्य ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहे. दिवंगतांच्या आत्म्यास शांती लाभो” असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

मुंबई महानगरात दोन बळी

मंगळवारपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा मुंबईला तडाखा बसला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी झाडे आणि फांद्यांची पडझड होण्याबरोबरच घरांच्या भिंती कोसळण्याच्या आणि शॉर्ट सर्किटच्याही घटना घडल्याचे समोर आले आहे. मंगळवार आणि बुधवारी एकूण १३५ झाडे आणि फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये काही ठिकाणी वाहनांचेही नुकसान झाल्याची माहिती आहे. मरोळमध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनावरच झाड पडल्याचा प्रकार बुधवारी घडला, तर प्रभादेवीतही झाड पडून गाड्यांचे नुकसान झाले.
Maharashtra TimesNavi Mumbai News : जलमय हायवेवरुन चालताना विजेचा धक्का, दोन कॉलेज तरुणी बेशुद्ध, रिक्षाचालक प्रवीण महाले ठरले देवदूत, फांदीची ट्रिक उपयुक्त
दुसरीकडे, वाळकेश्वर भागात बाल्कनीचा भाग कोसळून ५१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. संतोष भरसकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नवी मुंबईतील कामोठे सेक्टरमध्ये घराच्या बेडरुमच्या छताचे प्लास्टर बुधवारी पहाटे कोसळून सूरज लोखंडे या ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर १४ वर्षांची मुलगी या दुर्घटनेत जखमी झाली.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा