Navi Mumbai Two College Girls Electrocuted live wire on Waterlogged Highway at Nerul Crime News; जलमय हायवेवरुन चालताना विजेचा धक्का, दोन कॉलेज तरुणी बेशुद्ध, रिक्षाचालक प्रवीण महाले ठरले देवदूत, फांदीची ट्रिक उपयुक्त
Navi Mumbai Two College Girls Electrocuted live wire on Waterlogged Highway at Nerul Crime News; जलमय हायवेवरुन चालताना विजेचा धक्का, दोन कॉलेज तरुणी बेशुद्ध, रिक्षाचालक प्रवीण महाले ठरले देवदूत, फांदीची ट्रिक उपयुक्त
Navi Mumbai Girls Electrocuted : विद्युत वाहिनीचा तीव्र धक्का लागल्याने दोन कॉलेज तरुणी बेशुद्ध पडल्या, मात्र सिग्नलवर थांबलेल्या एका रिक्षाचालकाने प्रसंगावधान राखून झाडाच्या फांदीच्या साहाय्याने त्या तरुणींना त्या भागातून बाहेर काढले
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी मुंबई : नेरुळ उड्डाणपुलाजवळील सायन-पनवेल महामार्गाच्या मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर साचलेल्या पाण्यातून चालत असताना जमिनीखालील उघड्या विद्युत वाहिनीचा तीव्र धक्का लागल्याने दोन कॉलेज तरुणी बेशुद्ध पडल्या. बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जवळच ट्रॅफिक सिग्नलवर थांबलेल्या एका रिक्षाचालकाने प्रसंगावधान राखून झाडाच्या फांदीच्या साहाय्याने त्या तरुणींना त्या भागातून बाहेर काढले आणि तातडीने नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले.
जलमय हायवेवरुन चालताना दुर्घटना
उज्ज्वला वाघ (वय १८) आणि शुभांगी नलावडे (वय १६) अशी दोन युवतींची नावं आहेत. त्या दोघीही नेरुळमधील शिरवणे गावच्या रहिवासी असून, सीबीडी-बेलापूर येथील ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज’मध्ये शिकत होत्या. त्या बसने कॉलेजवरुन घरी परत जात होत्या. महामार्गावरील एका मिठाईच्या दुकानाजवळच्या बस स्टॉपवर उतरल्यानंतर फूटपाथपर्यंत पोहोचण्यासाठी त्या एकमेकींचा हात धरुन पाण्याने भरलेल्या हायवेवरुन चालत असताना ही घटना घडली.
मुलींना आयसीयूमध्ये हलवलं
रुग्णालयात डॉक्टरांनी त्या दोघींवर त्वरित उपचार करुन त्यांच्या प्रकृतीचा धोका टाळला. शुद्धीवर आल्यानंतर नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी रुग्णालयात जाऊन त्या मुलींची भेट घेतली. त्यांच्या सूचनेनुसार, त्या मुलींना एनएमएमसी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. Sachin Ahir : उपसभापती करा किंवा मंत्रिपद द्या, अहिरांनी दिलेले दोन पर्याय; ठाकरेंच्या तीन शिलेदारांची शिंदेंशी गुप्त चर्चा या घटनेनंतर, ठाणे येथील सहाय्यक विद्युत निरीक्षकांच्या उपस्थितीत MSEDCL चे तांत्रिक पथक आणि NMMC च्या विद्युत विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली; तिथे रस्त्याच्या मधल्या दुभाजकाजवळ भूमिगत वीजवाहिनी उघड्या अवस्थेत आढळून आली. एमएसईडीसीएलने यासंदर्भातील अहवाल सहाय्यक विद्युत निरीक्षकांकडे सादर केला.
देवदूत ठरला रिक्षावाला
मुलींना तातडीने रुग्णालयात नेणारे रिक्षा चालक प्रवीण महाले म्हणाले, “घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका ट्रॅफिक कॉन्स्टेबलने मुलींना उचलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यातील एका मुलीला स्पर्श करताच त्यालाही विजेचा सौम्य झटका बसला. एखाद्या लाईव्ह वायरमुळे तिथे विद्युत प्रवाह असल्याचे लक्षात आल्यावर, मी झाडाच्या फांदीचा वापर करून मुलींच्या बॅगा बाजूला केल्या आणि त्यानंतर ट्रॅफिक कॉन्स्टेबलच्या मदतीने त्यांना बाहेर काढले.”
Shrikant Shinde | मतदारसंघात जाऊन शिव्या देऊन राजकारण होत नसतं, ठाकरेंवर विखारी टीका
MSEDCL च्या जनसंपर्क अधिकारी ममता पांडे यांनी सांगितले की, “नेरुळ एल.पी. नाका उड्डाणपुलाखालील पथदिव्यांना NMMC च्या पथदिव्यांच्या मीटर कनेक्शनद्वारे वीजपुरवठा केला जातो.”
धोकादायक झाडांचा प्रश्नही ऐरणीवर
याआधी, चालत्या शालेय बसवर झाड कोसळून एक विद्यार्थी ठार आणि चार जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी मुंबईतील चेंबूर येथे घडली. विहान श्रीवास्तव (११) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून या दुर्घटनेमुळे शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. Ajinkya Naik : ना देवरा ना अहिर; 2029 मध्ये वरळीतील लोकप्रिय चेहरा दक्षिण मुंबईतून NDA चा लोकसभा उमेदवार? सोशल मीडियावर चर्चांना पेव टिळकनगर येथील युनिव्हर्सल हायस्कूल या शाळेची बस दुपारी पावणेतीनच्या सुमारास चेंबूर येथील मार्ग क्रमांक ११ वरून जात होती. त्यावेळी या बसवर अचानक एक भलेमोठे पिंपळाचे झाड कोसळले. बसमध्ये यावेळी १३ विद्यार्थी होते. झाड पडण्याचा आणि विद्यार्थ्यांच्या किंकाळ्यांचा आवाज ऐकून स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. बसचालकाने स्थानिकांच्या मदतीने बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा