Pune Shaniwarwada Water Management : ‘यापूर्वीच्या संशोधनातील जुने नकाशे आणि तक्ते पाहिल्यास शनिवारवाड्यातील काही जलवाहिन्या निकामी झाल्या असण्याची, काही बुजल्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलवाहिन्यांचे उत्खनन करुन पहिल्या टप्प्यात आराखडा जाणून घेणार आहोत. त्यानंतर संवर्धन सुरु होईल. त्यासाठी आम्ही केलेल्या प्रस्तावावर कार्यादेश प्रसिद्ध झाला आहे. काम पुढे सरकेल तसा केंद्राकडून निधी मिळणार आहे’, असं केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ संरक्षण सहायक गजानन मांडवरे यांनी म्हटलं आहे.

पाण्यावर मोठे कारंजेही बांधलेले
शनिवारवाड्यामध्ये सुरुवातीला पाण्याचा कायमस्वरूपी पुरवठा नव्हता. त्या काळात इतरत्र राबविल्या गेलेल्या नळ योजनांच्या धर्तीवर नानासाहेब पेशवे यांनी कात्रज गावाजवळ दोन धरणे बांधली. कृत्रिम तलाव बांधून तंत्रशुद्ध पद्धतीने नळयोजना राबवली आणि वर्षभर पाणीपुरवठा होईल, अशा पद्धतीने शनिवारवाड्यापर्यंत पाणी आणले. नियोजनपूर्वक, कौशल्याने हे पाणी संपूर्ण वाड्यात फिरविण्यात आले. या पाण्यावर मोठे कारंजेही बांधले होते. आता हे कारंजे बंद असून, वाड्यातील जलस्रोत व्यवस्थापनही कार्यरत नाही.
Nagpur News : मध्ये रेल्वेचा मोठा निर्णय; आसुसलेल्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, रेल्वे अन् एसटीची आषाढीची वारी, गावातून थेट विठूरायाकडे
हजारी कारंजाचेही पुनरुज्जीवन
शनिवारवाड्यातील ‘हजारी कारंजा’ ही आकर्षक आणि स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेली वास्तू आहे. सवाई माधवरावांच्या मनोरंजनासाठी नाना फडणवीस यांनी हे कारंजे बांधून घेतले होते. ते सोळा पाकळ्यांच्या कमळाच्या आकारातील असून, प्रत्येक पाकळीत १६ तोट्या (जेट्स) होत्या. अशा एकूण २५६ तोट्यांमधून पाणी उडत असे. कात्रज तलावातून आणलेल्या पाण्यावर ते चालत असे. त्याचे पुनरुज्जीवन होणार आहे.
दरवाजांचीही डागडुजी
शनिवारवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार, दिल्ली दरवाजाच्या संवर्धनाचा निर्णयही पुरातत्त्व विभागाने घेतला आहे. शनिवारवाड्याला दिल्ली दरवाजासह मस्तानी दरवाजा, खिडकी दरवाजा, नारायण दरवाजा आणि गणेश दरवाजा असे पाच दरवाजे आहेत. ऊन-वारा पावसामुळे दिल्ली दरवाजाच्या डागडुजीची गरज आहे. दरवाजाच्या कमानीलगतच्या दगडांमधील सांधे सैल झाले आहेत. संवर्धन कामासाठी निविदा काढण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ संरक्षण सहायक व संवर्धनतज्ज्ञ गजानन मांडवरे यांनी दिली.
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह राज्यातील ४ जिल्ह्यांसाठी ३ तास धोक्याचे, अतिमुसळधार पाऊस बरसणार; IMD चा ताजा अंदाज
काम कोण करणार?
केंद्रीय पुरातत्व विभागाचे तज्ञांचे पथक हे काम करणार आहे.
वाड्यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या संवर्धनाच्या कामात जलस्त्रोतांवर काही काम झाले नव्हते.
त्यामुळे पुरातत्त्व विभागातर्फे शनिवारवाड्यातील जल व्यवस्थापन आणि संवर्धन प्रकल्प हाती घेतला आहे.

