The Dassler Brothers Feud: पुमा आणि आदिदास या क्रीडा साहित्याच्या विश्वातील दोन दिग्गज कंपन्या आहेत. दोन जर्मन भावांनी या ब्रँडचा पाया घातला आणि तब्बल 30 वर्षे गाजवली. पण नंतर आपापसातील तीव्र स्पर्धेमुळे एकाच कुटुंबातील दोन भाऊ कायमचे वेगळे झाले आणि यामुळे जगातील दोन अब्जावधी डॉलर्स कट्टर प्रतिस्पर्धी ब्रँड – ADDIDAS आणि PUMA – जन्माला आले.

दोन भावांनी सुरू केला बुटांचा व्यवसाय
19वे दशक जर्मनीच्या इतिहासाला वेगळं वळण देणारे ठरले. 1900 सालापर्यंत जर्मनी युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेली आणि अमेरिका व ब्रिटननंतर जगात तिसऱ्या क्रमांकावर होती. जर्मनी मोठ्या उद्योगांचे केंद्र बनलेले. याच देशात दोन भावांचा जन्म झाला, ज्यांनी एकत्र एक छोटाशा बुटाचा व्यवसाय सुरू केला आणि तब्बल 30 वर्ष एकत्र या क्षेत्रात नावलौकिकाला आले. नंतर भावांच्या समबंधात कटुता आली आणि दोघे कायमचे वेगळे झाले.
इथूनच सुरू झाला पिक्चर
ॲडॉल्फ (आडी) डॅसलर आणि रुडॉल्फ डॅसलर या दोन भावंडांचे बालपण इतरांसारखेच होते, पण कदाचित नियतीच्या मनात काही वेगळेच होते. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीची आर्थिक परिस्थिती खालावली ॲडॉल्फ यांनी आपल्या घरात हाताने खेळाडूंसाठी बूट बनवायला सुरू केली. काही वर्षांनी भाऊ रुडॉल्फ देखील व्यवसायात सामील झाले. आडी बूट तयार करायचे, तर रुडॉल्फ विक्रीच काम करायचे आणि अशाप्रकारे, दोन भावांच्या मेहनतीच्या जोरावर व्यवसायात झपाट्याने वाढ झाली.
नावलौकाला कसे आले दोन भाऊ?
1936 च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये अमेरिकन धावपटू Jessie ओवेन्सने डॅसलर बंधूंचे बूट घालून चार सुवर्णपदके जिंकली आणि इथूनच त्यांच्या बुटांची जगभर चर्चा सुरू झाली. त्यानंतर झपाट्याने वाढ झाली आणि कंपनीचे नाव केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळखले जाऊ लागले.
दुसऱ्या महायुद्धाने खेळ बिघडवला
1939 मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले ज्यामुळे कच्च्या मालाची, विशेषतः चामड्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. पण तरीही कंपनीने खेळाडूंसाठी बुटाचे उत्पादन सुरूच ठेवले. दुसऱ्या महायुद्धाची शेवटची दोन वर्षे शिल्लक असताना कारखाना बंद करून त्याचा शस्त्र निर्मितीसाठी करण्यासाठी वापर करण्याचे आदेश दिले गेले.
रुडीच्या लोभाने संघर्ष सुरू झाला
पण त्याच क्षणी रुडीचा लोभ वाढला आणि कंपनीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचं स्वप्न पाहू लागले. कुटुंबातील इतर सदस्य कंपनीचा भाग बनू नये म्हणून आपली बहीण मेरीच्या मुलांना कंपनीत नोकरी देण्यासही नकार दिला, ज्याचे परिणाम विनाशकारी ठरले. मेरीच्या दोन्ही मुलांना युद्धभूमीवर पाठवले गेले आणि मारले गेले. यामुळे कुटुंबात कलह निर्माण झाला आणि रुडी व आदीच्या पत्नींमध्ये भांडणे सुरू झाली.
भावांमध्ये निर्माण झाली हीन भावना
त्यानंतर 1940 मध्ये आडी सैन्यात भरती झाले पण, लवकरच सेवेतून मुक्त केले गेले करा, त्यावेळी त्यांच्या कंपनीला त्यांची जास्त गरज होती. रुडीने पहिल्या महायुद्धात भाग घेल्यामुळे 1943 मध्ये युद्धावर पाठवले, ज्यामुळे संताप वाढला. आपल्याला युद्धभूमीवर पाठवण्यासाठी भाऊ जबाबदार आहे आणि यामुळे आडीला कंपनीवर पूर्ण नियंत्रण मिळेल, अशी भावना निर्माण झाली. 1943 पर्यंत जर्मनीमध्ये गेब्रूडर डॅसलर शुहफॅब्रिक ही एकमेव स्पोर्ट्स शूज बनवणारी कंपनी उरली होती.
रुडीचे वाईट दिवस सुरू झाले
शत्रूशी दोन हात करतानाही रुडीचे संपूर्ण लक्ष कारखान्यावर लागून होते. येथे त्याने रणनीती आखली. तुशिनच्या रणांगणावर असताना, आपल्या जागेवरून निसटला आणि हर्टझोगेनॉराखला परतला, पण नाझी गुप्तचर सेवेने त्याला अटक करून तुरुंगात टाकले. जोपर्यंत युद्ध चालू होते, तोपर्यंत रुडी तुरुंगात रागाने खदखदत होता तर दुसरीकडे, आदीच्या नेतृत्वात व्यवसायाची भरभराट झाली.
आदीने कंपनीत एकहाती वर्चस्व निर्माण केले
युद्ध संपले होते, पण रुडीची वेळ अजून गेली नव्हती. अमेरिकन्सनी नाझी पक्षाशी संबंधित शिक्षेची घोषणा केली आणि गुप्तचर सेवेशी संबंधाच्या संशयावरून अटक झालेल्या पहिल्या काही लोकांपैकी रुडी देखील होता. त्याने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला पण, आदीने नाझींशी संबंध असल्याचे कबूल केले आणि रुडीवरील खटला रद्द केला. त्याने आणखी एक वर्ष तुरुंगात घालवले आणि आदीने संपूर्ण व्यवसाय ताब्यात घेऊन आपली सत्ता आणखी वाढवली.
दुसऱ्या महायुद्धानंतर भाऊ विभक्त झाले
मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर दोन्ही भावांमध्ये मतभेद समोर येऊ लागले, ज्यामुळे दोघांनी अखेरीस 1948 मध्ये कायमचे वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आडी डॅसलर यांनी Adidas ची स्थापना केली, तर रुडॉल्फ यांनी Puma नावाचा स्वतंत्र ब्रँड सुरू केला. अशाप्रकारे, एकच घरात जांणलेले दोन ब्रँड एकमेकांचे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी बनले.
आज Adidas आणि Puma जगातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्स ब्रँडपैकी असले तरीही या दोघांचा किस्सा केवळ दोन कंपन्यांचा नाही तर स्वप्न, मेहनत, मतभेद आणि यश यांची प्रेरणादायी कहाणी आहे.

