Headlines

China News: सीक्रेट वॉर सुरुय! मासे, कासवांमुळे चीनचा भडका; जगभरात पाणबुड्या धाडणारा शेजारी संतापला


China News: अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू असताना चीनचं नौदल प्रचंड सक्रिय झालं होतं. या कालावधीत चिनी पाणबुड्या विशेष मोहिमेवर होत्या. पण आता त्याच चीनला समुद्रातील मासे आणि कासवांची भीती वाटू लागली आहे.

china xi fish
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बीजिंग: अमेरिका विरुद्ध इराण संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना चिनी नौदलाच्या पाणबुड्या सक्रिय झाल्या होत्या. अमेरिका युद्धाला गुंतलेली असताना चीननं संधी साधली. चिनी पाणबुड्यांनी हजारो किलोमीटर अंतर कापून समुद्राखालील रचनांचा अभ्यास करुन एक नकाशाचा तयार केला. भविष्यातील संघर्षासाठीची सज्जता म्हणून चीननं पाण्याखालील स्थितीचा, भौगोलिक रचनांचा आढावा घेतला. पण आता त्याच चीनला परकीय गुप्तचर यंत्रणांकडून होणाऱ्या हेरगिरीची भीती वाटू लागली आहे. समुद्रातून संवेदनशील माहिती गोळा केली जात असल्याचा दावा चीननं केला आहे. हा सगळा प्रकार म्हणजे एक गुप्त युद्ध असल्याचा चीनचा दावा आहे.

काही परकीय गुप्तचर यंत्रणा कासवं आणि माशांचा वापर आमच्या विरोधात हत्यारांसारखा करत असल्याचं चीननं म्हटलं आहे. परदेशी गुप्तहेर यंत्रणा नव्या उपकरणांच्या (मासे-कासवं) यांच्या आधारे संवेदनशील सागरी तपशील गोळा करत असल्याचा दावा चीनकडून करण्यात आला आहे. चीनच्या दाव्यामुळे समुद्रातील वाढता तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे.
Maharashtra TimesMiddle East Crisis: प्रत्येक घरात हाहाकार माजला असता! कतारनं इराणला मोठी ऑफर दिलेली; नाकारल्यानं जगावरचं संकट टळलं
परकीय हेर आणि गुप्तचर यंत्रणा देशाच्या सागरी किनाऱ्यांच्या निगराणीसाठी, टेहळणीसाठी नव्या नव्या पद्धतींचा वापर करत आहेत. यामध्ये सेन्सर लावण्यात आलेल्या जलचरांच्या वापराचाही समावेश असल्याचा दावा चीनच्या सुरक्षा मंत्रालयानं केला आहे. चीनच्या आसपास समुद्रात अदृश्य गुप्त युद्ध सुरू असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

परकीय यंत्रणा सागरी जीवांच्या माध्यमातून संवेदनशील तपशील गोळा करत आहेत. पाण्याखालील परिस्थिती, भौगोलिक रचना यांची माहिती गोळा करुन त्यांचे नकाशे तयार करण्यासाठी या माहितीचा वापर केला जात असल्याचं चिनी मंत्रालयानं म्हटलं. जलचरांच्या माध्यमातून केली जाणारी हेरगिरी आमच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका आहे. यासाठी कासवं आणि माशांचा वापर होत आहे. हे प्राणी चीनच्या सागरी हद्दीत सेन्सरला जोडलेल्या स्थितीत आढळून आले आहेत, असं चिनी मंत्रालयानं सांगितलं.
Maharashtra TimesDonald Trump: भारतीय जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! ट्रम्प यांनी इराणवर खापर फोडलं; वातावरण तापलं
सागरी जीव पर्यावरणाशी संबंधित संवेदनशील डेटा गोळा करत आहेत. यामध्ये पाण्याचं तापमान, सागरी प्रवाह, पाण्यातील क्षारांचं प्रमाण यांचा समावेश असल्याचं चीननं सांगितलं. पाण्याखालून गोळा करण्यात आलेली सर्व माहिती सागरी जीव सॅटेलाईटच्या माध्यमातून परदेशी पाठवत आहेत, असं चीननं म्हटलं. समु्द्राखालून तपशील गोळा करणारे प्राणी नेमके कुठे सापडले आणि ते कोणत्या देशासाठी हेरगिरी करत होते, याबद्दल चिनी मंत्रालयानं काहीही सांगितलेलं नाही.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा