Headlines

Nashik Malegaon Camp Aniket Jagtap Death Case Registered Against Wife and Relatives; वर्षभरापूर्वी सात जन्माच्या आणाभाका, हसत्या-खेळत्या संसारात कुरकुर, कंटाळून नवऱ्याचं टोकाचं पाऊल; अनिकेतच्या नातेवाईकांचा गंभीर आरोप


Nashik Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नाशिकमध्ये एक मोठी घटना समोर आली आहे. अनिकेत बाळासाहेब जगताप याच्या आत्महत्येप्रकरणी मोठी घडामोड घडली आहे.

Malegaon Camp Aniket Jagtap Death Case
नाशिक साने गुरुजी नगर अनिकेत जगताप आत्महत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जयेश साबळे, नाशिक : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिक शहरातील मालेगाव कॅम्प भागातील साने गुरुजी नगरात अनिकेत बाळासाहेब जगताप (वय 27) या तरुणानं केलेल्या आत्महत्येप्रकरणी कॅम्प पोलिसांनी पत्नीसह सासू-सासरे व मामेसासू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या धक्कादायक घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

संसारात सतत वाद

अनिकेत जगताप याचा वर्षभरापूर्वी पंचशील नगरातील श्रुती जगताप (वय 22) या तरुणीशी विवाह झाला होता. मात्र, लग्न झाल्यानंतर काही दिवसांत दोघांमध्ये सतत वाद सुरु होते. श्रुती ही अनिकेतजवळ येत नव्हती तसेच तिने अनिकेतविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानं तो गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता. याच त्रासाला कंटाळून अखेर त्यानं टोकाचं पाऊल उचलत राहत्या घरात आपलं आयुष्य संपवलं.
Maharashtra TimesMarathi Actress: हिरोईन होण्यासाठी गावाकडून मुंबईत आली, अलगद देह व्यापाराच्या जाळ्यात; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा एका रात्रीसाठी लाखोंना सौदा

अनिकेतचा मानसिक छळ

दरम्यान, याप्रकरणी सर्वात आधी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, अनिकेतचे वडील बाळासाहेब जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलिसांनी अनिकेतचा मानसिक छळ केल्याप्रकरणी पत्नी श्रुती जगताप, सासू वंदना सुभाष धिवरे, सासरे सुभाष सुकदेव धिवरे आणि मामेसासू उज्वला सतीश पवार (सर्व रा. पंचशील नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर सासू आणि सासरे यांना पोलिसांनी अटक केली असून पत्नी श्रुती आणि मामेसासू उज्वला पवार हे फरार झाले आहेत. ‘श्रुतीला आणि मामेसासूला तत्काळ अटक करा, अन्यथा आम्ही आत्मदहन करू’, असा इशारा मयत अनिकेच्या कुटुंबीयांनी आणि आई-वडिलांनी दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज निकम करत आहेत.
Maharashtra TimesChaitanya Chandratre : रस्ते चांगले करणाऱ्यांना गांधीजी हवेत, खड्डे पुन्हा मुंबईकरांच्या कवेत! मुंबईतील खड्ड्यांवरुन मराठी अभिनेत्याचे तिरकस टोले

नाशिकमध्ये सेवानिवृत्त व्यक्तीला लाखोंचा गंडा

सेवानिवृत्त झाल्यानंतर निवांत जगण्याच्या दिवसांत अचानक मोबाईल स्क्रीनवर ‘फ्रेंडशिप रिक्वेस्ट’ येते. प्रोफाइलवर पश्चिम बंगालच्या एका बड्या कंपनीची तरुण महिला ‘सीईओ’, नाव अंजली अग्रवाल! सुरुवातीला हाय-हॅलो, मग कौटुंबिक गप्पा, आवडीनिवडी आणि हळूहळू वाढलेली जवळीक. आयुष्याच्या उत्तरार्धात आभासी दुनियेत मैत्रीण मिळाली, परंतु त्यामागे ‘सायबर हनी ट्रॅप’ होता. त्यामुळे एका रात्रीत सेवानिवृत्तासह तिघांची आयुष्याची पुंजी फस्त झाली. याप्रकरणी शहर सायबर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा