Headlines

Donald Trump Crypto Investment Earning; एका वर्षात 132 लाख कोटींची कमाई… डोनाल्ड ट्रम्प यांनी इतका पैसा कुठून आणला? US राष्ट्राध्यक्षांच्या क्रिप्टो खेळीने वादंग


Donald Trump Crypto Income: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर कमबॅक केल्यापासून डोनाल्ड ट्रम्प आपल्या टॅरिफ निर्णयामुळे सतत चर्चेत राहिले आहेत. तर आता ताज्या आर्थिक revelation मुळे ट्रम्प यांच्या संपत्तीच्या स्त्रोतामध्ये नाट्यमय बदल झाल्याचे उघड झाले असून अमेरिकेच्या सरकारी नीतिमत्ता कार्यालयाने ट्रम्पच्या हॉटेल्स, गोल्फ रिसॉर्ट्स आणि क्रिप्टो व्यवसायांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा तपशील देणारा अहवाल प्रसिद्ध केला.

Donald Trump Crypto Income 2025 Revealed
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Donald Trump News: अमेरिकेचे राष्ट्रध्यपदी एक वर्षांपासून जास्त काळानंतरही डोनाल्ड ट्रम्प व्यावसायिक बनून राहिले आहेत. व्हाईट हाऊसमध्ये असताना ट्रम्प यांनी गेल्या वर्षभरात इतका मोठा क्रिप्टोकरन्सी व्यवसाय उभारला आहे की त्यांची कमाई अब्जावधी डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. होय, ट्रम्प यांनी 2025 या वर्षात क्रिप्टोकरन्सी आणि Memecoin संबंधित व्यवसायातून किमान 1.4 अब्ज डॉलर्स म्हणजेच 132,53,35,200 (एकशे बत्तीस कोटी, त्रेपन्न लाख, पस्तीस हजार दोनशे रुपये) रुपयांपेक्षा जास्त प्रचंड कमाई केल्याचे उघड झाले आहेत.

मंगळवार, 30 जून रोजी अमेरिकेच्या सरकारी नीतिमत्ता कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांमधून ही माहिती समोर आली. अमेरिकेत 1978 मध्ये लागू केलेल्या कायद्यानुसार राष्ट्राध्यक्ष आणि उप-राष्ट्राध्यक्षांना उत्पन्न आणि मालमत्ता जाहीर करणे बंधनकारक आहे.
Maharashtra TimesGold Silver Prices July 1: सराफा बाजाराचे कधी अप, कधी डाऊन सुरूच; महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी धडाम, किती झालं स्वस्त?

ट्रम्पच्या अब्जावधींच्या मालमत्तेचा तपशील उघड

अमेरिकेच्या सरकारी नीतिमत्ता कार्यालयाने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या 927 पानांच्या अहवालात ट्रम्प यांच्या हॉटेल्स, गोल्फ रिसॉर्ट्स, क्रिप्टो व्यवसाय आणि इतर गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाची सविस्तर माहिती प्रसिद्ध केली आहे. या 927 पानांच्या अहवालानुसार, ट्रम्प यांच्या memecoin कंपनी, सीआयसी डिजिटल एलएलसीने एकट्याने 636 दशलक्ष डॉलर्स – अंदाजे 5,978 कोटी रुपये – उत्पन्न नोंदवले.
Maharashtra TimesGas Cylinder Price Cut 1st July 2026: महिन्याच्या सुरुवातीलाच खुशखबर! मुंबईसह दिल्ली कोलकात्यात LPG स्वस्त झाला; पाहा नवीन दर काय?

ट्रम्प यांनी कुठून-कुठून कमाई केली

ट्रम्प यांची ही कमाई सेलिब्रेशन कॉईनसोबत परवाना करारातून मिळणाऱ्या रॉयटीतून झाली. या कंपनीच्या डिजिटल वॉलेटमध्ये अंदाजे 560 कोटी रुपयांच्या इतर क्रिप्टो करन्सीदेखील आहेत. ट्रम्प यांच्या वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल या कंपनीने 594 दशलक्ष डॉलर्स किंवा अंदाजे अंदाजे 5583 कोटी रुपयेपेक्षा जास्त कमाई केली असून या कंपनीच्या सह-संस्थापकांमध्ये स्वतः ट्रम्प, त्यांचा मुलगा आणि प्रशासनातील वरिष्ठ मुत्सद्दी स्टीव्हन विटकॉफचा समावेश आहे.

ट्रम्प यांनी स्टेबलकॉइन्समधील आपला हिस्सा विकून अंदाजे 1850 कोटी रुपये कमावले तर, यासह ट्रम्प यांची एकूण नेटवर्थ $7.6 अब्ज म्हणजे अंदाजे अंदाजे 71,440 कोटी रुपयांवर पोहोचली आहे असे ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकातून समोर आले.
Maharashtra TimesEthanol Petrol: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्सिंग केवळ चाचपणीसाठी, पुढच्या वर्षी अहवाल येतील! सरकारी वकिलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

गोल्फ कोर्स अन् हॉटेल्सची कमाईही मागे

साधारणपणे ट्रम्प यांच्या उत्पन्नात आलिशान हॉटेल्स आणि जागतिक दर्जाच्या गोल्फ रिसॉर्ट्सचा मोठा वाटा असल्याचा समज आहे. पण, पारंपरिक व्यवसाय त्यांच्या क्रिप्टो कमाईच्या तुलनेत फिके पडले. ट्रम्प यांनी आपल्या मालकीच्या प्रसिद्ध मार-ए-लागो रिसॉर्टने 77 दशलक्ष डॉलर्स (तब्बल 7.23 अब्ज रुपये) आणि उत्तर व्हर्जिनियामधील गोल्फ क्लबने 25 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 2.25 अब्ज रुपये) कमावले.

शेअर्समध्ये ट्रम्प यांची गुंतवणूक
ट्रम्प यांची गुंतवणूक केवळ क्रिप्टोपर्यंत मर्यादित राहिली नाही, तर त्यांनी शेअर्समध्येही मोठी गुंतवणूक केली असून यापैकी ॲमेझॉन, ॲपल, Nvidia, मायक्रोसॉफ्ट, नेटफ्लिक्स आणि एक्सॉन मोबिल यासारख्या जागतिक कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसा ओतला आहे.

FIFA विश्वचषक आणि सुपर बाउलची तिकिटे भेट
या आर्थिक खुलाशात ट्रम्प यांना काही सर्वात महागड्या आणि VIP भेटवस्तूंचा तपशीलही दिला. यासोबतच ट्रम्प यांना फिफा विश्वचषक आणि यूएस ओपन टेनिस स्पर्धेची महागडी तिकिटेही मिळाली होती.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा