Headlines

भारताचा आज कठीण पेपर, बांगलादेशने आफ्रिकेचा गेम केला तर भारताची सेमी फायनलमध्ये एन्ट्री फिक्स, समीकरण जाणून घ्या


मुंबई : भारताची रविवारी महिलांच्या टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरच्या साखळी लढतीत ऑस्ट्रेलियाशी गाठ पडणार आहे. उपांत्य फेरीतील स्थान मिळवण्याच्या दृष्टीने भारतीय संघासाठी ही लढत ‘करो वा मरो’ अशीच असणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया लढतीला जणू उपांत्यपूर्व फेरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गेल्या वर्षी वन-डे क्रिकेट वर्ल्ड कपच्या उर्पात्य लढतीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला हरवले होते. आता पुन्हा एकदा तशाच कामगिरीची अपक्षा भारतीय महिलांकडून आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय खेळाडूंना क्षेत्ररक्षणात आणि फलंदाजीतील चुका सुधाराव्या लागणार आहेत.

‘अ’ गटात ऑस्ट्रेलिया संघ आठ गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. भारतीय संघ सहा गुणांसह (नेट रनरेट+ २.२६८) दुसऱ्या स्थानी, तर दक्षिण आफ्रिका संघ सहा गुणांसह (०.७३४) तिसऱ्या स्थानी आहे. भारत-दक्षिण आफ्रिका – लढतीआधी दक्षिण आफ्रिकेची बांगलादेशशी लढत आहे. या लढतीत दक्षिण आफ्रिकेने बाजी मारल्यास, भारतीय संघासाठी विजय अनिवार्य असणार आहे; मात्र हरल्यास आव्हान संपुष्टात येईल. बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला हरवले, तर भारतीय संघावरील दडपण कमी होईल. भारतीय संघ नेट रनरेटमध्ये दक्षिण आफ्रिकेपेक्षा सरस आहे.
Maharashtra TimesWomen’s T-20 World Cup 2026 : फक्त ऑस्ट्रेलियाला हरवणं पुरेसं आहे का? सेमीफायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला नेमकं काय करावं लागेल?
महिला वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सामना चुरशीचा पाहायला मिळाला आहे. परंतु ऑस्ट्रेलियाचे पारडे नेहमी जड राहिली आहे. आतापर्यंत सात सामन्यांंमध्ये ऑस्ट्रेलियाने ५ तर भारताने २ विजय मिळवले आहेत. हेड टू हेड कामगिरी ऑस्ट्रेलियाच्या संघाची दमदार राहिली आहे.
Maharashtra TimesIND vs IRE: आयर्लंडविरुद्ध टीम इंडिया ढेपाळली, पण सूर्या दादाकडून एकाचं जाम भारी कौतुक; काय म्हणाला माजी कर्णधार?
भारतीय महिला संघ: स्मृती मानधना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (C), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (WK), दीप्ती शर्मा, राधा यादव, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर, नंदनी शर्मा, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, भारती फुमवा, भारती फुवा, राधा यादव.

ऑस्ट्रेलिया महिला संघ: बेथ मूनी (WK), जॉर्जिया व्होल, एलिस पेरी, ॲशली गार्डनर, जॉर्जिया वेअरहॅम, ॲनाबेल सदरलँड, निकोला कॅरी, सोफी मोलिनक्स (C), अलाना किंग, किम गार्थ, लुसी हॅमिल्टन, फीबी लिचफील्ड, मेगन शूट, ग्रेस हॅरिस, ताहलिया मॅकग्रा

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत