Headlines

8th Pay Commission Fitment Factor; 8व्या वेतन आयोगाच्या हालचाली अंतिम टप्प्यात; पगारवाढीत सरकारच अडसर ठरणार? फिटमेंट फॅक्टरबाबत मोठे संकेत


Central Govt Employees Fitment Factor: आठवा केंद्रीय वेतन आयोग राज्य सरकारांसोबत वाटाघाटींच्या अंतिम टप्प्यात असून केंद्र आणि राज्य सरकारांवरील आर्थिक भार लक्षात घेता आयोग फिटमेंट फॅक्टरबाबत सावधगिरी बाळगण्याची शक्यता आहे. आयोगाने अद्याप आपल्या शिफारशींना अंतिम रूप दिले नसले तरी, प्राथमिक चर्चेनुसार फिटमेंट फॅक्टर 7 व्या वेतन आयोगाच्या 2.57 गुणकाच्या जवळपासच असू शकतो.

8th Pay Commission Fitment Factor News
फिटमेंट फॅक्टर आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत मोठे संकेत(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
8th CPC Fitment Factor : देशातील सुमारे 1.2 कोटी केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनर्स आठव्या वेतन आयोगाच्या प्रत्येक हालचालींकडे करडी नजर ठेवून आहेत. नवीन फिटमेंट फॅक्टर आणि त्यामुळे पगार व निवृत्तीवेतनात किती वाढ होईल यावर सर्वांचे लक्ष लागले असून 8 व्या वेतन आयोगाच्या लखनौ येथील बैठकांचे सत्र सुरू संपन्न झाले आणि आता जुलै महिन्यात भुवनेश्वर, कोलकाता येथे होणाऱ्या आगामी बैठकांची प्रतीक्षा आहे.

फिटमेंट फॅक्टरवर केंद्रीय कर्मचाऱ्यांची नजर

जितक्या लवकर आयोग आपला अहवाल सादर करेल आणि सरकार त्याला मंजुरी देईल, तितक्याच लवकर कर्मचाऱ्यांना नवीन वेतन रचनेचा फायदा मिळू लागेल. पण फिटमेंट फॅक्टरबाबत आयोग आणि सरकारची अंतिम भूमिका सर्वात महत्त्वाची असेल. अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नसला तरी, देशव्यापी बैठका आणि प्राथमिक चर्चांमधून सरकारी तिजोरीवरील मोठा भार लक्षात घेता, आयोग फिटमेंट फॅक्टरबाबत एक संतुलित आणि सावध भूमिका घेण्याची चिन्हे मिळत आहे.
Maharashtra TimesProperty Rules: वडिलांनी एकाच मुलाला मालमत्ता दिल्यास दुसऱ्या मुला-मुलीचा हक्क राहतो का? हे कितपत कायदेशीर, नियम काय सांगतो

फिटमेंट फॅक्टरवर कर्मचारी संघटनेची मागणी काय

नॅशनल कौन्सिल (NC-JCM) आणि रेल्वेसह विविध संघटनांनी 3.15 ते 3.83 पर्यंत फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी केली आहे. ही मागणी मान्य झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18000 रुपयांवरून 68,940 रुपयांपर्यंत वाढेल. अशाप्रकारे, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची एकीकडे चंगळ होईल पण दुसरीकडे, सरकारच्या तिजोरीवर दबावही वाढेल.
Maharashtra TimesInflation Rate: अमेरिकेत महागाईचा आगडोंब, पण चटके जगाला; भारतावरही होणार परिणाम, बाजारासाठी नेमकं संकेत काय?
अशा स्थितीत, सरकार 50 लाख कर्मचारी आणि 69 लाख निवृत्ती वेतनधारकांसाठी प्रारंभिक फिटमेंट 1.83 ते 2.28 दरम्यान निश्चित करू शकते. इकॉनॉमिक टाइम्सने एका संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला देऊन सांगितले की नव्या वेतन आयोगाच्या चर्चेचा अंतिम टप्पा आता फिटमेंट फॅक्टरची संभाव्य श्रेणी, राज्य सरकारांशी चर्चा आणि सुधारित वेतन व निवृत्तीवेतन रचनेच्या आर्थिक परिणामाचे मूल्यांकन करणे या दोन हालचालींवर असेल. केंद्र आणि राज्य सरकारांवरील आर्थिक भाराचे मूल्यांकन अंतिम वेतन व निवृत्तीवेतन रचना निश्चित करण्यात निर्णायक भूमिका बजावू शकते.
Maharashtra TimesLPG Supply: अखेर ‘तो’ दिवस आलाच! LPG पुरवठ्याबद्दल सरकारचा मोठा निर्णय; कोट्यवधी नागरिकांना दिलासा

फिटमेंट फॅक्टरचा सरकारच्या तिजोरीवर ताण

फिटमेंट फॅक्टर वाढल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना केवळ वेतनवाढ मिळत नाही तर पेन्शनमध्येही वाढ होते. याशिवाय थकबाकी आणखी एक मोठा खर्च आहे. अशा स्थितीत, 2.28-2.86 चा फॉर्म्युला निवडून सरकार हुशारीने निर्णय घेईल. फिटमेंट फॅक्टर 2.28 असल्यास मूळ पगारात 34.1 टक्के म्हणेज 41000 रुपये वाढ होईल. अशाप्रकारे, सरकार नक्कीच फिटमेंट फॅक्टरबाबत सावध भूमिका घेऊ शकते.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा