Headlines

साधेपणा आणि एलिगंट लुकने जिंकली मने, पण प्रकृतीबाबत चाहत्यांची चिंता


पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहताना अलका याज्ञिक यांनी अतिशय साध्या आणि एलिगंट स्टाइलची निवड केली होती. त्यांनी भडक दागिन्यांऐवजी नाजूक नेकलेस, कानातले आणि हलके दागिने परिधान केले होते. त्यांच्या या साधेपणामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलून दिसत होते. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी त्यांच्या सोज्वळ आणि ग्रेसफुल लुकचे कौतुक केले.

Alka Yagnik Padma Bhushan Award
फोटो सौजन्य :- @therealalkayagnik, @ANI
भारतीय संगीतविश्वातील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी पार्श्वगायिकांपैकी एक असलेल्या अलका याज्ञिक यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना हा प्रतिष्ठेचा नागरी सन्मान प्रदान केला. राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या भव्य समारंभात त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र या आनंदाच्या क्षणातही अनेक चाहत्यांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. पुरस्कार स्वीकारताना दिसलेल्या अलका याज्ञिक यांच्या प्रकृतीकडे पाहून काही चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या आरोग्याविषयी विविध चर्चा सुरू असून अनेकांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केल्या आहेत.पण याच वेळी तिचा साधा सिंपल लुक चाहत्यांना खूप भावला. (फोटो सौजन्य :- @therealalkayagnik, @ANI)

साधा सिंपल लुक

साधा सिंपल लुक

समोर आलेल्या फोटोंमध्ये अलका याज्ञिक अतिशय साध्या आणि सोज्वळ लुकमध्ये सत आहेत. ग्लॅमरच्या दुनियेत अनेक कलाकार भपकेबाज पोशाख आणि दागिन्यांमुळे चर्चेत येतात. मात्र अलका याज्ञिक यांनी नेहमीप्रमाणेच साधेपणाला प्राधान्य दिले. फिकट रंगाचा पारंपरिक ड्रेस, हलका मेकअप आणि नम्र व्यक्तिमत्त्व यामुळे त्या विशेष आकर्षक दिसत होत्या. त्यांच्या या साधेपणाने चाहत्यांची मने जिंकली.

साधेपणा चाहत्यांना भावला

साधेपणा चाहत्यांना भावला

अनेक सोशल मीडिया युजर्सनी त्यांच्या लूकचे कौतुक करताना “खरी स्टार अशीच असते”, “यशाच्या शिखरावर पोहोचूनही साधेपणा कायम ठेवणारी कलाकार” अशा प्रतिक्रिया दिल्या. आजच्या काळात प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या झगमगाटातही स्वतःची ओळख जपणाऱ्या अलका याज्ञिक यांचे चाहते विशेष कौतुक करत आहेत. मात्र पुरस्कार स्वीकारतानाचे काही फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर काही चाहत्यांनी त्यांचा चेहरा पूर्वीपेक्षा थोडा खूश दिसत असल्याचे म्हटले आहे.

सिंपल दागिने परिधान करून लुक केला पूर्ण

सिंपल दागिने परिधान करून लुक केला पूर्ण

पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहताना अलका याज्ञिक यांनी आपल्या पेहरावासोबत अतिशय साधे आणि मोहक दागिने परिधान केले होते. त्यांनी कोणत्याही भडक किंवा अतिमहागड्या दागिन्यांचा वापर न करता नाजूक नेकलेस, कानातले आणि हलकेसे ब्रेसलेट घालून आपला लुक पूर्ण केला. त्यांच्या या साधेपणामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलून दिसत होते. विशेष म्हणजे, आजच्या ग्लॅमरच्या युगात अनेक सेलिब्रिटी आकर्षक आणि झगमगाटी फॅशनची निवड करतात, मात्र अलका याज्ञिक यांनी साधेपणातूनही सौंदर्य खुलवता येते हे दाखवून दिले.

आजही तशीच हेअरस्टाईल

आजही तशीच हेअरस्टाईल

अलका याज्ञिक यांच्या लुकमधील आणखी एक खास गोष्ट म्हणजे त्यांची सिग्नेचर हेअरस्टाईल. गेली अनेक वर्षे त्या ज्या साध्या आणि एलिगंट हेअरस्टाईलमध्ये दिसतात, त्याच शैलीची झलक पद्मभूषण पुरस्कार सोहळ्यातही पाहायला मिळाली. खांद्यांपर्यंत असलेले मोकळे केस आणि नैसर्गिक लूक यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक उठून दिसत होते. बदलत्या फॅशन ट्रेंडनुसार अनेक सेलिब्रिटी आपल्या लुकमध्ये सतत बदल करत असतात, मात्र अलका याज्ञिक यांनी आपली ओळख बनलेली हेअरस्टाईल आजही कायम ठेवली आहे.

अलका याज्ञिक यांना पद्मभूषण पुरस्कार

टिकलीने पूर्ण केला लुक

टिकलीने पूर्ण केला लुक

अलका याज्ञिक यांच्या संपूर्ण लुकमध्ये कपाळावरील छोटीशी लाल टिकली विशेष लक्षवेधी ठरली. पारंपरिक भारतीय सौंदर्याची झलक देणाऱ्या या टिकलीमुळे त्यांचा सोज्वळ आणि मोहक अंदाज अधिक खुलून दिसत होता. साधा पेहराव, नाजूक दागिने आणि नैसर्गिक मेकअपसोबत त्यांनी लावलेली टिकली त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच शोभा देत होती. आजच्या आधुनिक फॅशनच्या युगातही पारंपरिक शैलीला प्राधान्य देणाऱ्या अलका याज्ञिक यांनी आपल्या या लुकमधून साधेपणातील सौंदर्य पुन्हा एकदा अधोरेखित केले.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा