Amravati Brothers booked for Assaulting College Student after Party Crime News; कॉलेज पार्टीत पेयातून गुंगीचं औषध, सख्ख्या भावांचा विद्यार्थिनीवर अत्याचार, अश्लील व्हिडिओवरुन ब्लॅकमेल, महाराष्ट्र हादरला
Amravati Brothers booked for Assaulting College Student after Party Crime News; कॉलेज पार्टीत पेयातून गुंगीचं औषध, सख्ख्या भावांचा विद्यार्थिनीवर अत्याचार, अश्लील व्हिडिओवरुन ब्लॅकमेल, महाराष्ट्र हादरला
Amravati Student Assault : पेयात गुंगीचे औषध मिसळून बेशुद्ध करत दोन सख्ख्या भावांनी विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, अमरावती : कॉलेजच्या अंतिम वर्षाच्या गेट-टुगेदर पार्टीत एका विद्यार्थिनीला पेयात गुंगीचे औषध मिसळून बेशुद्ध केले आणि तिच्यावर दोन सख्ख्या भावांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढ्यावरच न थांबता तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करून तब्बल सात-आठ महिने ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी पोलिसांनी चेतन गणेश अंबाडकर आणि आकाश गणेश अंबाडकर (दोघेही रा. निर्मला कॉलनी, जुनीवस्ती, बडनेरा) या दोन भावांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
नेमकं काय घडलं?
तक्रारीनुसार, २६ मे २०२५ रोजी रहाटगाव येथील हॉटेलमध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी गेट-टुगेदर पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत चेतन आणि आकाश हे दोघेही सहभागी झाले होते. चेतनने वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील विद्यार्थिनीला पार्टीसाठी बोलावले. पार्टीदरम्यान तिच्या पेयात गुंगीचे औषध मिसळण्यात आले. पेय घेतल्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्यानंतर हॉटेलमधील एका खोलीत चेतन अंबाडकर याने तिच्यावर अत्याचार केल्याचे आरोप आहे. Pune News : मळणीयंत्रात केस अडकले, पुण्यात महिलेचा हृदयद्रावक अंत, वाढदिवशीच मृत्यूने गाठलं
आक्षेपार्ह व्हिडिओवरुन ब्लॅकमेल
या घटनेचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी विद्यार्थिनीला वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी बोलावले. तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवत ५ लाख रुपयांची मागणीही केली. भीतीपोटी विद्यार्थिनीने हा प्रकार कुटुंबीयांपासून लपवून ठेवला. मात्र, मानसिक छळ असह्य झाल्यानंतर तिने अखेर धाडस दाखवत नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
माजी महापौराविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा
दुसरीकडे, अहिल्यानगरचे माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्याविरोधात तरुणीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून आपल्यावर पुणे आणि नगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी अनेकदा अत्याचार केल्याचे या २५ वर्षीय तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. नगरच्या ‘एमआयडीसी’ पोलिस ठाण्यात कळमकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. Crime News : आठवीतील सहा विद्यार्थिनींशी अश्लील चाळे, नामांकित शाळेतील शिक्षकाला अटक, महाराष्ट्र सुन्न पीडित तरुणीच्या फिर्यादीनुसार, अभिषेक कळमकर यांनी आपल्याला शाळेत नोकरी लावून देतो, असे सांगितले होते. यातून विश्वास संपादन करून संपर्क वाढविला. त्यानंतर अत्याचार करण्यास सुरुवात केली. नगर शहरातील विविध ठिकाणी, पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील एका लॉजवर नेऊन अत्याचार केले. मोबाइलवर व्हिडीओ कॉल करून कपडे काढण्यास भाग पाडले. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली, असेही फिर्यादीत म्हटले आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा