Headlines

Latur zilla-parishad-election-2026-winner-list-maharashtra-zp-election-result-winning-candidates | Latur ZP Election 2026 Winner List : काँग्रेसची मुसंडी! लातूर जिल्हा परिषदेच्या संपूर्ण विजयी उमेदवारांची यादी एका क्लिकवर


लातूर जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांची यादी आम्ही तुम्हाला देणार आहोत. लातूरमध्ये काँग्रेसने मोठी मुसंडी मारली आहे. पण महायुतीला इथे यश आलं आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या सर्व विजयी उमेदवारांची यादी जाणून घेऊयात.

Latur zilla-parishad-election-2026-winner-list-maharashtra-zp-election-result-winning-candidates
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ऋषिकेश होळीकर, लातूर : राज्यातील 12 जिल्हा परिषदेसाठी सोमवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. लातूर जिल्ह्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपला गेल्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले होते. मात्र यावेळी भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुसंडी मारलेली पाहायला मिळाली आहे. जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गटाने युती केली होती. मागील निवडणुकीत काँग्रेसकडे 15 जागा होत्या. यावेळी काँग्रेसने तब्बल 23 जागा जिंकत सर्वाधिक जागा जिंकण्याचा मान मिळवला आहे. गेल्या वेळेपेक्षा आठ जागांची वाढ काँग्रेसच्या पारड्यात पडली आहे. आमदार अमित देशमुख यांनी एकहाती लढत देत केवळ काँग्रेसचे अस्तित्व टिकवले नाही, तर पक्षाच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ केली आहे.

लातूर जिल्हा परिषद विजयी पक्षीय बलाबल

भाजप : 18
काँग्रेस :23
शिवसेना : 01
शिवसेना UBT: 01
NCP अजित पवार : 12
NCP शरद पवार : 01
मनसे : 01
अपक्ष : 02

औसा तालुक्यातील ९ गट

  • 1 सुभाष पवार किल्लारी गट काँग्रेस
  • 2 सई गोरे आशिव गट काँग्रेस
  • 3 संदिपान शेळके उजनी गट भारतीय जनता पार्टी
  • 4 तानाजी जाधव खरोसा गट उभाठा
  • 5 पुनम मुक्ता लोदगा गट भाजपा
  • 6 दिपाली भोसले मातोळा गट काँग्रेस
  • 7 छाया चिंचोलीकर भदागट भाजप
  • 8 शालिनी चव्हाण लामजना गट काँग्रेस
  • 9 शितल चिलमे आलमला गट भाजप

लातूर तालुका 10 गट

  • 1 राज्यश्री देशमुख आर्वी गट काँग्रेस
  • 2 महादेव गुलाब साळुंखे भातांगळी गट भाजप
  • 3 महादेव मस्के महाराणा प्रताप नगर गट काँग्रेस
  • 4 सोनाली थोर मोठे पाखर सांगवी काँग्रेस
  • 5 भागीरथी पाटील हरंगुळ बु गट काँग्रेस
  • 6 अश्विनी शिंदे काटगाव काँग्रेस
  • 7 श्रीकांत माने तांदूळजा गट काँग्रेस
  • 8 जयश्री तवले मुरुड राष्ट्रवादी अजित पवार गट
  • 9 दिपाली आदमाने निवळी काँग्रेस
  • 10 दत्तात्रय टेकाळे एकुर्गा काँग्रेस

रेणापूर तालुक्यातील 4 गट

  • 1 शिवकन्या गोडभरले खरोळा गट भाजप
  • 2 सुनील नागरगोजे पानगाव मनसे
  • 3 मनीषा कदम पोहरेगाव काँग्रेस
  • 4 आशा भिसे कामखेडा काँग्रेस

अहमदपूर तालुक्यातील 6 गट

  • 1 शितल खोमणे खंडाळी राष्ट्रवादी शप
  • 2 अजिंक्य देशमुख हाडोळती भाजप
  • 3 उत्तम माने शिरूर ताजबंड राष्ट्रवादी अप
  • 4 प्रतीक्षा गुट्टे किनगाव भाजप
  • 5 आश्विनी नगराळे रोकडा सावरगाव राष्ट्रवादी अप
  • 6 प्रफुल्लचंद्र गुंडरे अंधोरी राष्ट्रवादी अप

जळकोट तालुक्यातील 3 गट

  • 1 शांताबाई अदावळे गुती काँग्रेस
  • 2 नागेश्वरी केंद्रे हिप्परगा काँग्रेस
  • 3 धम्मपाल देवशेट्ट वांजरवाडा अपक्ष

देवणी तालुक्यातील 3 गट

  • 1 औदुंबर पांचाळ बोरोळ काँग्रेस
  • 2 उषा पाटील वलांडी भाजप
  • 3 रामलिंग शेरे जवळगा भाजप

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील 2 गट

  • 1 माणिक गायकवाड साकोळ काँग्रेस
  • 2 तुळजाबाई लोंढे येरोळ भाजप

चाकुर तालुक्यातील 5 गट

  • 1 दयानंद सुरवसे जानवळ राष्ट्रवादी अप
  • 2 रंजना चाटे चापोली राष्ट्रवादी अप
  • 3 उषा सोनकांबळे रोहिना राष्ट्रवादी अप
  • 4 भानुदास पोटे वडवळ नागनाथ राष्ट्रवादी अप
  • 5 अमर पाटील नळेगाव भाजप

उदगीर तालुक्यातील 7 गट

  • 1 रामचंद्र तिरुके वाढवणा भाजप
  • 2 उषा भुजबळे सोमनाथपूर भाजप
  • 3 रूपाली गायकवाड नळगीर काँग्रेस
  • 4 दीपक सोमवंशी निडेबन राष्ट्रवादी
  • 5 मुकेश भालेराव लोहारा काँग्रेस
  • 6 दिलीप कुमार मटके हेर राष्ट्रवादी अप
  • 7 ज्ञानेश्वर बिराजदार तोगरी राष्ट्रवादी अप

निलंगा तालुक्यातील 10 गट

  • 1 रोहित पाटील निटूर भाजप
  • 2 चंद्रकांत होरे अंबुलगा भाजपा
  • 3 मानसी मरुरे लांबोटा काँग्रेस
  • 4 शाहिद पटेल दापका काँग्रेस
  • 5 तानाजी बिराजदार हलगरा भाजप
  • 6 योगिता जाधव औराद शहाजानी काँग्रेस
  • 7 शरयू माने मदनसुरी शिवसेना शिंदे गट
  • 8 कविता गोरे सरवडी भाजप
  • 9 उमाजी उमापुरे कासार शिरशी राष्ट्रवादी अप
  • 10 मीरा तू बसले तांबाळा अपक्ष
चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा