Headlines

Latur Puranmal Lahoti Government Technical College 21 Year Old Youth Killed; बाईकचं स्पीडोमीटर फोडण्यावरुन वाद, लातूरला शिकायला आलेल्या तरुणाला संपवलं; आई-बापाचा आक्रोश


Latur Youth Murder : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच लातूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण पसरलं आहे.

Puranmal Lahoti Government Technical College 21 Year Old Youth Killed
लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन तरुणाची हत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ऋषीकेश होळीकर, लातूर : लातूर शहरात मागील काही दिवसांपासून हत्येच्या घटना वारंवार होताना दिसून येत आहेत. अगदी काही दिवसांपूर्वीच लातूर शहराचे आमदार अमित देशमुख यांच्यासमोरच हत्येची घटना घडली होती. यानंतर अवघ्या 10 दिवसांमध्येच लातूर शहरातील औसा रोड या गजबजलेल्या परिसरात काल सायंकाळी पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या समोर एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. गाडीचे स्पीडोमीटर फोडल्यामुळे काही दिवसांपूर्वी वाद झाला होता, याचे रूपांतर हत्येमध्ये झालं.

उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

लातूर शहरात खळबळजनक घटना घडली असून विक्रम पांचाळ (वय 21) या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. ही घटना औसा रोडवरील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. या हाणामारी दरम्यान विक्रम पांचाळ याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत विक्रमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं; मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
Maharashtra TimesBaramati Crime: तरुणीची स्कुटी अडवली, जबरदस्तीने घरी नेलं आणि…; बारामतीत संतापजनक घटना, तरुणाला पोलिसांचा दणका!

शिक्षणासाठी तरुण लातूरमध्ये

विक्रम पांचाळ हा लातूरमध्ये शिक्षणासाठी वास्तव्यास असून तो हॉस्टेलवर राहत होता. तो लातूर जिल्ह्यातील कुंभारवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाणे येथील अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आरोपी तरुण घटना घडताच फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे औसा रोड परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
Maharashtra TimesNavi Mumbai Crime : मॅट्रिमोनियल साईटवर ओळख, लग्नाच्या आमिषाने नवी मुंबईच्या 32 वर्षीय महिलेवर अत्याचार, 12 लाख लुबाडून फसवणूक

चार आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात तीन दिवसांपूर्वी गाडीचे स्पीडोमीटर फोडल्याच्या वादाचे रूपांतर हत्येत झाले. यात पोलिसांनी आतापर्यंत चार तरुणांना ताब्यात घेतलं असून याचा अधिक तपास सुरू आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे व त्यांची टीम पुढील तपास करत आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा