स्वानंदी सरदेसाई हिचा वट सावित्री सणानिमित्तचा गुलाबी साडीतील लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. तिच्या साध्या मेकअप, हलक्या दागिन्यांमुळे आणि केसातील फुलांमुळे हा लूक अधिकच नाजूक आणि आकर्षक दिसत आहे.या पारंपरिक अंदाजातून तिच्या व्यक्तिमत्त्वातील सौम्यता, आत्मविश्वास आणि मराठमोळी ओळख सुंदरपणे अधोरेखित झाली आहे.

मराठी मनोरंजनविश्वात आपल्या सहजसुंदर गाण्याने आणि साध्या पण प्रभावी व्यक्तिमत्त्वाने ओळख निर्माण केलेली स्वानंदी सरदेसाई पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी कारण कोणताही नवा सिनेमा, गाणं किंवा प्रोजेक्ट नसून, पारंपरिक सणाच्या निमित्ताने दिसलेला तिचा खास साजशृंगार आहे. या लूकमध्ये तिच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वास आणि पारंपरिकतेचा अभिमान विशेष ठळकपणे जाणवत होता. साध्या पण आकर्षक मेकअपने तिच्या नैसर्गिक सौंदर्याला अधिक उठाव दिला, तर केसांची नीट बांधलेली रचना आणि हलके दागिने यामुळे तिचा एकूण लूक अधिकच मोहक आणि संतुलित दिसत होता.
अनेक चाहत्यांनी तिच्या या साधेपणाला “खरे मराठमोळे सौंदर्य” असे संबोधले आहे.वट सावित्री हा सण केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित नसून, तो स्त्रीच्या श्रद्धा, निष्ठा आणि कौटुंबिक मूल्यांचे प्रतीक मानला जातो. अशा पवित्र दिवशी स्वानंदीने निवडलेली गुलाबी साडी ही तिच्या सौम्य आणि सकारात्मक व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक ठरली. (फोटो सौजन्य :- @Swanandi Sardesai)
स्वानंदी सरदेसाईचा वटपौर्णिमेचा लुक
स्वानंदी सरदेसाई हिचा पिंक साडीतील लुक सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. वट सावित्रीच्या पहिल्या सणानिमित्त तिने परिधान केलेली गुलाबी रंगाची साडी तिच्या व्यक्तिमत्त्वाला एक अतिशय नाजूक, सात्विक आणि आकर्षक स्पर्श देऊन गेली.हलका गुलाबी रंग, त्यावर असलेले साधे पण सुंदर बॉर्डर डिझाईन आणि अत्यंत मिनिमल दागिने यामुळे तिचा लूक खूपच एलिगंट दिसत होता. पारंपरिक साडीला तिने दिलेला आधुनिक टच आणि साधेपणा यामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसले. चेहऱ्यावरचा हलका मेकअप, नीट बांधलेले केस आणि आत्मविश्वासपूर्ण हास्य यामुळे तिचा एकूण अंदाज खूपच मोहक वाटत होता.
केसात माळलेल्या फुलाने पूर्ण केला लुक
स्वानंदीने हिच्या पिंक साडीतील लूकला केसात माळलेल्या नाजूक फुलांनी अगदी परिपूर्णता दिली आहे.साध्या पण मोहक अशा या फुलांच्या अॅक्सेसरीमुळे तिचा संपूर्ण लूक अधिकच नैसर्गिक आणि उठावदार दिसत होता. साडीच्या सौम्य गुलाबी रंगाला जुळणारे केसातील फुल हे तिच्या व्यक्तिमत्त्वातील सात्विकता आणि पारंपरिकतेची जाणीव अधिक ठळकपणे अधोरेखित करत होते.
दागिन्यांनी पूर्ण केला लुक
स्वानंदीने हिच्या पिंक साडीतील लूकला दागिन्यांनी एक खास आणि उठावदार टच दिला आहे.हलके पण आकर्षक असे पारंपरिक दागिने नाजूक नेकलेस,आणि साध्या बांगड्या यामुळे तिचा संपूर्ण लूक अधिकच एलिगंट आणि बॅलन्स दिसत होता. दागिन्यांचा अतिशय अवजड किंवा चमकदार वापर न करता केलेली ही निवड तिच्या साधेपणाला अधोरेखित करणारी ठरली.पिंक साडीचा सौम्य रंग आणि सोनसळी दागिन्यांची हलकी चमक यांचा सुंदर कॉन्ट्रास्ट तिच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक उठाव देत होता.
सिंपल मेकअप
स्वानंदी सरदेसाई हिच्या वट सावित्री सणाच्या लूकमध्ये सर्वात जास्त उठून दिसलेली गोष्ट म्हणजे तिचा सिंपल मेकअप.गुलाबी साडी आणि पारंपरिक दागिन्यांसोबत तिने अतिशय हलका आणि नैसर्गिक मेकअप निवडला होता. चेहऱ्यावर जड फाउंडेशन किंवा ओव्हर मेकअपऐवजी नैसर्गिक त्वचेचा टोन जपलेला दिसत होता. हलका बीबी ग्लो, सौम्य ब्लश आणि न्यूड लिपस्टिक यामुळे तिच्या चेहऱ्याला ताजेतवाने आणि नैसर्गिक चमक मिळाली.
असा घेतला उखाणा
स्वानंदीने हिच्या वट सावित्री निमित्त केलेल्या साजशृंगाराइतकाच तिचा घेतलेला उखाणा सध्या चर्चेत आहे. पारंपरिक सणाच्या आनंदात रंगलेली स्वानंदी तिच्या सहज, खेळकर आणि मराठमोळ्या शैलीमुळे पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. “दोघांचा संसार तेव्हाच होतो सुकर, दोघांचा संसार तेव्हाच होतो सुकर, जेव्हा मी चिरण भाजी विक्रांत लावेल कुकर” हे ऐकताच उपस्थितांमध्ये हशा पिकला आणि सोशल मीडियावरही तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

