Amravati Accident: धारणी-परतवाडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा मृत्यू, तर सहा मजूर जखमी झाले आहेत.

पिकअप थेट ३० फूट खोल दरीत
लवादा गावातील मजूर नेहमीप्रमाणे उदरनिर्वाहासाठी टरबूज आणि खरबूज काढणीच्या कामाला जाण्यासाठी पिकअप गाडीत बसले होते. सकाळी गाव सोडल्यानंतर काही अंतरावरच अलई नदीचा पूल लागतो. पुलावर गाडी आली असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेली पिकअप पुलाचे सिमेंटचे कठडे तोडून थेट ३० फूट खोल दरीत कोसळली.
खंडोबाचं दर्शन ठरलं अखेरचं! दिवे घाटात भरधाव ट्रकच्या धडकेत बाप-लेकीचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी
दोघींचा जागीच मृत्यू
या भीषण अपघातात समाय चुनीलाल सावलकर (४०) आणि मालती मिठाराम भिलावेकर (१८) या दोघींचा जागीच मृत्यू झाला. जखमींना तातडीने धारणी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. चालक राम रवींद्र कोल्हे याची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अमरावतीला पाठवण्यात आले आहे. सुष्मिता जांभेकर (२०), अस्मिता जांभेकर (१६) आणि ममता कासदेकर (२६) यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Jalna News : क्षणात सगळं संपलं! भरधाव ट्रक झाडावर आदळला, दोन जिवाभावाच्या सोबत्यांचा करुण अंत
तर दुसऱ्या एका घटनेत, मुर्शिदाबाद येथील चौदा वर्षीय विद्यार्थी शाळेत जात असताना ट्रकच्या धडकेत जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. कृष्णा दत्तात्रय म्हस्के (वय १४, रा. मुर्शिदाबाद, ता. गंगापूर) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. शनिवारी कृष्णा म्हस्के शाळेत जात असताना इसारवाडी ते बिडकीन रस्त्यावरील मुक्तेश्वर साखर कारखाना समोर अपघात झाला. या वेळी ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील कृष्णा म्हस्के जागीच ठार झाला. या प्रकरणी दत्तात्रय म्हस्के यांच्या फिर्यादीवरून वाळूज पोलिस ठाण्यात ट्रकचालक रामनिवास बलेदेवराव (रा. हरियाणा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

