Sachin Ahir leaves Uddhav Thackeray reasons to join Shiv Sena Eknath Shinde; ठाकरेंचे विश्वासू, विधान परिषदेवर संधी, तरी शिवबंधन का सोडलं? सचिन अहिरांच्या धक्कादायक निर्णयामागील शक्यता समोर
Sachin Ahir leaves Uddhav Thackeray reasons to join Shiv Sena Eknath Shinde; ठाकरेंचे विश्वासू, विधान परिषदेवर संधी, तरी शिवबंधन का सोडलं? सचिन अहिरांच्या धक्कादायक निर्णयामागील शक्यता समोर
Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026 : सचिन अहिर हे ठाकरे पिता पुत्रांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जात असतानाच त्यांनी हा निर्णय का घेतला, याचे कारण समोर आले आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनी शिवबंधन सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑपरेशन टायगर सुरु असताना ठाकरे पिता पुत्रासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. सचिन अहिर हे ठाकरेंचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जात असतानाच त्यांनी हा निर्णय का घेतला, याचे कारण समोर आले आहे. महाविकास आघाडीत असताना पुन्हा विधान परिषदेवर निवडून जाणं दुरापास्त असल्याने त्यांनी ठाकरेंची साथ सोडल्याची चर्चा आहे.
सचिन अहिर हे ठाकरेसेनेच्या उपनेतेपदी असले, तरी निर्णय प्रक्रियेत त्यांना स्थान नसल्याचे बोलले जाते. खासदार संजय दिना पाटील हे अहिर यांचे निकटवर्तीय मानले जातात. पाटील यांच्या पक्षांतरावेळीच अहिर यांनाही ऑफर होती, अशी माहिती आहे. आता विधान परिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीचे टायमिंग साधत सचिन अहिर यांनी मोठा धक्का दिल्याचे चित्र आहे.
६ फुटीर खासदार मिंधेकडे गेले, भाजपात का नाही गेले? ठाकरेंनी सांगितलं ‘ऑपरेशन देवेंद्र’
१९९९ मध्ये सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडणूक लढवत विधानसभेवर विजय मिळवला. नंतर २००४ आणि २००९ मध्येही त्यांनी आपली आमदारकी राखण्यात यश मिळवले. सलग तिसऱ्यांदा आमदारकी भूषवताना २००९ साली काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहनिर्माण विभागाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी आली. २०१४ मध्ये त्यांना शिवसेनेचे उमेदवार सुनील शिंदे यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला. मंत्रिपद भूषवल्यानंतर विजयाने हुलकावणी दिल्याने त्यांच्यावर मोठी नामुष्की ओढावली होती. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शरद पवार यांची साथ सोडत तत्कालीन एकसंध शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी होते.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा