Headlines

Nitin Deshmukh: ठाकरेंचे नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ने खळबळ; MLA नितीन देशमुखांकडून अफवा असल्याचे स्पष्ट – shivsena ubt corporator not reachable mla nitin deshmukh clarifies its rumor


Nitin Deshmukh: अपक्षांना पोषक महापौरपदाचे आरक्षण निघाल्यास अडीच वर्षांचा फॉर्म्यूला ठरण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

nitin deshmukh
nitin deshmukh aloka(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, अकोला: शिवसेना (उबाठा)चे सहा नगरसेवक मंगळवारी नॉट रिचेबल झाले असून भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा पसरली होती. मात्र आमदार नितीन देशमुख यांनी पक्षाचे सहाही नगरसेवक सोबत असल्याचा खुलासा करीत चर्चांना विराम देण्याचा प्रयत्न केला. सोबतच ‘आम्हाला घेतल्याशिवाय भाजप किंवा काँग्रेस सरकार बनवू शकत नाही. तरीही आम्ही पक्षश्रेष्ठी सांगतील तसा निर्णय घेऊ. अद्याप आमचा कुठलाही निर्णय झालेला नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकीत भाजपला ३८ जागा मिळाल्या. या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली होती. शिवसेनेने स्वतंत्र लढत दिली. सत्ता स्थापनेसाठी ४१ सदस्यांची गरज आहे. सध्या भाजपचे ३८ आणि राष्ट्रवादीचा एक असे ३९ नगरसेवक आहेत. शिवसेना आणि महानगर विकास समितीच्या प्रत्येकी एक सदस्यांचा पाठिंबा मिळाल्यास भाजपला सत्तास्थापनेसाठीचे ‘मॅजिक फिगर’ गाठणे शक्य आहे. त्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत.

Maharashtra TimesBeed News : बीडमध्ये ग्रामसेवकाचं अपहरण, बायकोनेच रचलेला कट, नवऱ्यासमोर ठेवलेल्या दोन अटी, नेमकं प्रकरण काय?
हाच प्रकार काँग्रेस व इतर समविचारी पक्षांचा आहे. त्यांचीसुद्धा सदस्यसंख्या ३९ होत आहे. त्यांनाही दोन सदस्यांची गरज आहे. त्यामुळे आता अकोल्यातील महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्याकरिता महानगर विकास समितीचा एक सदस्य, प्रभाग १३मधून निवडून आलेले अपक्ष उमेदवार आशिष पवित्रकार व शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या उषा विरक या तिघांचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

२५ वर्ष जिल्हा सांभाळतोय, खासदारांना गैरसमज; धानोरकरांच्या आरोपांना वडेट्टीवारांचं उत्तर

शिवसेनेच्या विरक यांचा भाजपला पाठिंबा
शिवसेनेच्या एकमेव नगरसेवक उषा विरक यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याने भाजपचे सदस्यबळ ४०वर पोहचले आहे. मॅजिक फिगर गाठण्यासाठी आता केवळ एका सदस्याची गरज पडणार आहे. येत्या आठवड्यात महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. या पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघणार, महापौरांची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याविषयीच्या चर्चा वाढू लागली आहे. आत्तापासूनच महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. भाजपमध्ये दावेदारांची संख्या अधिक आहे. संख्याबळही सत्तास्थापनेसाठी अगदीच जवळचा आहे. तरीही एका सदस्याची गरज लागणार असल्याने हा नगरसेवक कुठल्या अटीवर भाजपला समर्थन देणार याकडे लक्ष लागून आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा