Headlines

Amol Mitkari | अजित पवारांचा घातपात झाला असेल तर बदला घेण्याची जबाबदारी आपली – amol



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#amolmitkari #ncp #ajitpawarplanecrash #ajitpawaraccidentdeath #devendrafadnavis #bjp अमोल मिटकरी यांनी सांगितलं की, घटनेच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता ते घटनास्थळी गेले असता, तेथील सरपंचांनी धक्कादायक माहिती दिली. विमानातून कोणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी पाहिलं होतं.त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही जात असतानाच अचानक स्फोट झाला आणि पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, असं सरपंचांनी सांगितल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे. या विधानामुळे संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.अजित पवार यांच्या मृत्यूचं गूढ महाराष्ट्रासमोर राहू नये, त्याचा संपूर्ण उलगडा व्हावा यासाठी आपण जिवंत असेपर्यंत लढा देणार असल्याचा ठाम संकल्प अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. अजित पवार यांचा घातपात झाला असेल, तर त्याचा बदला घेणं ही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी असल्याचंही ते म्हणाले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत