Headlines

AI Super Bubble Crash Prediction; Stock Market साठी रेड अलर्ट; AI Super Bubble फुटण्याच्या बेतात; चीनमधून थम्प्स डाऊन… गुंतवणूकदारांचं वाढलं टेन्शन


AI Super Bubble Crash Alert: आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, AI, बद्दल जगभर मोठ्या प्रमाणात क्रेझ पाहायला मिळत असलं तरीही जागतिक बाजारात वेगळंच चित्र दिसत आहे. आशियासह अमेरिकी शेअर मार्केटमध्ये एआयचा बुडबुडा आता फूटू लागला आहे. दोन प्रमुख चीनी हेज फंडांनी AI Stocks बाबत गंभीर इशारा दिला आणि जागतिक AI स्टॉक्समध्ये एक सुपर बबल तयार झाल्याचे म्हटले.

Chinese Hedge Funds Warn AI ‘Super Bubble’ Ready to Burst
चिनी हेज फंडांचा दावा… एआयचा ‘सुपर-बबल’ फुटणार(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
AI Bubble Burst Warning: जगभर एआयच्या वाढत्या प्रभावामुळे जागतिक शेअर बाजारांमध्ये खळबळ उडाली आहे. दिवसेंदिवस आर्टिफिशिअल इंटेलिजन्सबद्दल नवीन हालचाली समोर येताना चीनच्या दोन प्रमुख हेज फंडांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI, संबंधित स्टॉक्सबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ब्लूमबर्गनी या दोन हेज फंडांचा हवाला देऊन म्हटले की, जागतिक AI स्टॉक्समधील तेजीने आता एका सुपर बबलचे स्वरूप धारण केले आहे जो कोसळण्याचा क्षण आता फार दूर नाही.

एआयचा महा‘बबल’ फुटीच्या वाटेवर
वेलस्प्रिंग असेट आणि शांघाय बानशिया इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट सेंटरने गुंतवणूकदारांना लिहिलेल्या नोटमध्ये एआय क्षेत्राबाबत अनेक इशारे दिले. इतर काही चीनी हेज फंडांनीही AI मध्ये गुंतवणूक करण्याबाबत सावध भूमिका घेतल्याचेही अहवालात पुढे म्हटले पण, यावर्षी अनेक AI-संबंधित स्टॉक्समध्ये मोठी वाढही दिसून आली. परिणामी भविष्यातील वाढीबद्दल संभ्रम निर्माण झाला.
Maharashtra TimesGold Silver Rate Crash: सराफा बाजारात घबराट… पिवळसर सोने 17000 रुपये, चांदीची किंमत 51000 रुपयांनी उतरली; भाव कमी होण्याची काय आहेत कारणे?
चिनी हेज फंडांनी नेमकं काय म्हटलं
‘जागतिक AI स्टॉक्समधील तेजी आता शाश्वत राहिलेली नाही,’ असे वेलस्प्रिंग असेट आणि शांघाय बानशिया इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट सेंटरने म्हटले. वेलस्प्रिंग असेटने अलीकडच्या एआय स्टॉक्समधील तेजीला ‘सुपर बबल’ म्हणून संबोधले असून हा बबल कोसळण्याचा क्षण फार दूर नाही असेही म्हटले. या दरम्यान, बानशियानेएआय बबल फुटण्यास कारणीभूत ठरणारी परिस्थिती आधीच निर्माण झाल्याचा दावा केला.

विशेष म्हणजे बँक्सिया इन्व्हेस्टमेंटने आपल्या पत्रात अँथ्रोपिकचे उदाहरण दिले आणि म्हटले की बाजारात खळबळ उडवून दिलेल्या या एआय कंपनीचा वार्षिक महसूल दर बाजाराच्या अपेक्षांपेक्षा कमी पडू शकतो. टोकन्सच्या वाढत्या खर्चामुळे मोठ्या टेक कंपन्या माघार घेण्याची शक्यता या फंडाने पुढे व्यक्त केली तर, अँथ्रोपिकचे स्पर्धक देखील लोकप्रियता कमी करू शकतात असे म्हटले.
Maharashtra TimesDelayed Possession: घराचा ताबा दिला म्हणजे ग्राहकांचे अधिकार संपले का? बिल्डर लॉबीला सुप्रीम कोर्टाने सुनावलं! नक्की काय घडलं
80 टक्के घसरणीचा अंदाज
त्याचवेळी, वेलस्प्रिंगने चीनच्या देशांतर्गत शेअर बाजारातील काही सर्वाधिक चर्चित शेअर्स 80 टक्क्यांहून अधिक घसरणीचा अंदाज वर्तवला, पण कोणत्याही विशिष्ट स्टॉक्सची नावे घेतली नाही.
Maharashtra Timesनव्या आयकर प्रणालीत मिळतात 5 टॅक्स बेनिफिट; तुम्ही वाचवू शकता कर, ITR भरण्यापूर्वी जाणून घ्या कसा आणि कुठे
AI निर्देशांक रॉकेटच्या स्पीडने उसळला
चीनचा CSI आर्टिफिशियल इंटेलिजन्स निर्देशांकाने यावर्षी 35% हून जास्त तेजीने उसळली घेलती आणि मुख्य निर्देशांकाच्या जवळपास 5% वाढीला मागे टाकले. याउलट दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक जवळपास 100% वधारला असून SK हायनिक्स आणि सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या जोरदार वाढीमुळे कोरियन निर्देशांक तेजीच्या रथावर स्वार झालेला.

(Disclaimer : वरील तपशील केवळ माहितीसाठी आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते, त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या. तुमच्या नफा किंवा तोट्यास लेखक किंवा महाराष्ट्र टाइम्स व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.)

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा