Headlines

टीम इंडिया टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर, ऑस्ट्रेलियाने बाजी मारली, भारतीय क्रिकेटप्रेमींचं स्वप्न भंगलं


T-20 World Cup 2026, IND W vs AUS W Match Result : भारतासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मॅच खूप महत्त्वाची होती. पण दुर्दैवाने आता यंदाच्या वर्ल्डकपमधील भारताचा प्रवास इथेच संपला आहे. महिला टी-२० विश्वचषक २०२६ मधील करो वा मरोच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ विकेट्सनी पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे.

australia defeat india by 6 wickets reach semifinal
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : महिला टी-२० विश्वचषक २०२६ मधील करो वा मरोच्या सामन्यात भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला. लॉर्ड्सवर झालेल्या निर्णायक लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ विकेट्सनी पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. या पराभवासह भारतीय संघाचा स्पर्धेतील प्रवासही संपुष्टात आला. भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ४ बाद १७० धावा केल्या होत्या. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या तडाखेबाज अर्धशतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर १७१ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी संयमी आणि आक्रमक खेळी करत हे लक्ष्य ४ विकेट्स गमावत गाठले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने गटातून उपांत्य फेरीचे तिकीट प्राप्त केले. दुसरीकडे, उपांत्य फेरीच्या आशा बाळगणाऱ्या भारताला पराभवामुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. करो वा मरोच्या या सामन्यात पराभव झाल्याने भारतीय महिला संघाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नही भंगले आहे.

ऑस्ट्रेलियाचा धोबीपछाड

दरम्यान, १७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. रेणुका सिंह ठाकूरने जॉर्जिया व्होलला अवघ्या ४ धावांवर बाद करत भारताला सुरुवातीचं यश मिळवून दिलं. त्यानंतर श्री चरणीने फोबी लिचफिल्डला २४ धावांवर माघारी धाडत भारताच्या आशा कायम ठेवल्या. अनुभवी फलंदाज बेथ मुनीलाही मोठी खेळी करता आली नाही. तिने २० चेंडूत २२ धावा केल्या. मात्र त्यानंतर एलिस पेरी आणि ॲशले गार्डनर यांनी डावाची सूत्रे हाती घेत भारताच्या गोलंदाजांवर दबाव आणला. पेरीने ३८ चेंडूत ५६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर गार्डनरने २९ चेंडूत नाबाद ५३ धावा करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

भारतीय क्रिकेटप्रेमींच्या पदरी निराशा

या विजयासह ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्स राखून सामना जिंकत महिला टी-२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. दुसरीकडे, या पराभवामुळे भारतीय संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. ऑस्ट्रेलियासोबतच दक्षिण आफ्रिकेनेही उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केलं आहे. भारतीय संघ कुठे कमी पडला? खेळात काय सुधारणा गरजेच्या होत्या, हे आता संघ व्यवस्थापनाला पाहावे लागणार आहे, पण सध्यातरी भारतीय क्रिकेटप्रेमींच्या पदरी सध्या निराशा पडली आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा