Headlines

Sanjay Jadhav May Gives Signal of Leaving Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Party


उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आगामी काळात मोठा धक्का बसणार का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कारण परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Shiv Sena UBT
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परभणीचे खासदार संजय जाधव हे पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चांना सातत्याने उधाण येत आहे. विशेष म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला संजय जाधव हे गैरहजर राहिले होते. मार्च महिन्यात बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीतही ते गैरहजर होते. यावरुन ते पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ‘ऑपरेशन लोटस’ सुरु असल्याच्या चर्चा सातत्याने समोर येत आहे. या सर्व चर्चांनंतर संजय जाधव यांच्या एका वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

परभणीत एका मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनावेळी संजय जाधव यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी आपल्या मनाची होत असलेली घालमेल शब्दांतून व्यक्त केली आहे. आपल्याला पक्षासोबत प्रतारणा करायची नाही, असं संजय जाधव म्हणत आहेत. पण दुसरीकडे उद्याची परिस्थिती काय निर्माण होईल ते आज सांगू शकत नाही, असंही संजय जाधव म्हणाले आहेत. आर्थिक निकषांवर राजकारण सुरु असल्याचं देखील संजय जाधव म्हणाले आहेत.

संजय जाधव नेमकं काय म्हणाले?

“मी पक्षाचा आजही आदर करतो, कालही आदर करत होतो आणि उद्याही करणार. मी कधीही प्रतारणा केली नाही आणि करायची मानसिकता सुद्धा नाही. पण शेवटी उद्याची परिस्थिती काय-काय निर्माण होईल ते आज सांगू शकत नाही. म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह टाकू शकतो. शेवटी राजकारण आता समाजकारणावर अवलंबून राहिलेलं नाही. आर्थिक निकषांवर राजकारणाला आता मोठं बळ मिळालेलं आहे. मतदाराला सुद्धा वाटतं की, मला किती नगदी मिळणार आहेत ते बघा. मतदानाच्या दिवशी मोठ्या-मोठ्या परिवारातील लोकं पैसे मागत नव्हते. पण माझ्या घरात सात मतं आहेत बरका, अशी जाणीव करुन देत होते. हेही आम्ही अनुभवलं आहे”, असं वक्तव्य संजय जाधव यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकारणात चर्चा होत आहे.

‘योग येईल तेव्हा ठरवू’

“अशा बदलत्या परिस्थितीत कोण काय-काय भूमिका घेतंय, हे सगळं बघून भूमिका घेत आहेत. समाजासाठी काही करायचं आहे, समाजासाठी काही केलं पाहिजे या भूमिकेतून काम करत असताना जीवनात चढ-उतार येत असतात. आम्ही उतार खूप बघितले, चढ बघायचा बाकी आहे. ज्यादिवशी काय योग येईल तेव्हाचं तेव्हा ठरवू, पण निश्चित मी आज तुमच्या सोबत आहे. त्यामुळे तुम्ही मनात शंका-कुशंका आणायचं कारण नाही”, असं संजय जाधव यांनी स्पष्ट केलं.

“स्वार्थ ठेवायचा नाही. परमार्थ करायचा आहे. परमार्थ करता-करता स्वार्थ सुद्धा साधला जाऊ शकतो. त्यामुळे त्यामध्ये फार जास्त उहापोह करायची गरज नाही. फक्त सवलत देताना गरिबाला द्या, मोठ्याला देऊ नका, मी या मताचा आहे. तेच खरं पुण्याचं काम आहे”, असं संजय जाधव यावेळी म्हणाले.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा