Headlines

bhandara son-in-law killed father-in-law with help of friends over property dispute; सासऱ्याच्या प्रॉपर्टीवर जावयाचा डोळा; मित्रांच्या मदतीने रस्त्यात गाठून संपवलं, पुलाखाली लपवली बॉडी अन्…


Bhandara Crime: मित्रांच्या मदतीने जावयाने सासऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुलाखालील सिमेंटच्या पायलीत लपवून ठेवला. घटनेनं खळबळ

crime
crime(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, भंडारा: सासऱ्याची संपत्ती बळकाविण्याच्या प्रयत्नात असलेल्या जावयाने मित्राच्या मदतीने सासऱ्याला रस्त्यात अडवून गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना कोकणागड येथे रविवारी उघडकीस आली. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पुलाखालील सिमेंटच्या पायलीत लपवून ठेवला होता.

याप्रकरणी कारधा पोलिसांनी आरोपी जावयासह त्याच्या मित्राविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार आहेत. किशोर धर्मा कंगाले (वय ६५) रा. भंडारा असे मृतकाचे नाव आहे. अमित रमेश लांजेवार (वय ३५) रा. शिवाजी वॉर्ड, भंडारा असे मुख्य आरोपी जावयाचे नाव आहे.

किशोर कंगाले यांचे जावई अमित याच्यासोबत संपत्तीच्या कारणावरून वाद सुरू होता. त्यातच आरोपी जावई व किशोर यांची मुलगी हे दोघेही त्यांच्या भंडारा येथील घरी राहण्यास आले होते. त्यामुळे जावयाच्या भीतीपायी किशोर कंगाले हे आठ महिन्यांपासून आपल्या कोकणागड येथील पुतण्याच्या घरी राहण्यास आले होते. ९ जानेवारी रोजी कंगाले हे कोकणागडवरून शिंगोरी येथे आपल्या शेतावर जाण्यासाठी दुचाकीने निघाले असता अमित व त्याच्या मित्राने त्यांना अडवून मारहाण केली. त्यानंतर गळा दाबून खून केला.

Maharashtra Timesदुर्दैवी! लग्नाच्या दोन दिवस आधीच काळानं साधला डाव; बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेवाचा मृत्यू, अख्खं गाव सुन्न
काका घरी परत न आल्याने किशोर यांचा पुतण्या मंगेश कंगाले यांनी कारधा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. दरम्यान, ९ जानेवारी रोजीच अमित आपल्या मित्रासोबत आपल्याला मारहाण करीत असल्याची माहिती किशोर यांनी त्यांचा मित्र सुनील चौधरी यांना फोनवरून दिली होती. परंतु, तेवढ्यात त्यांचा फोन कट झाला होता. किशोर कंगाले हे बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू झाला. त्यांची दुचाकी घटनास्थळापासून अर्धा किमी अंतरावर रस्त्यावर दिसून आली. तसेच त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, शर्ट व बनियान रस्त्याच्या कडेला असलेल्या एका शेतात पडलेले दिसले. ११ जानेवारी रोजी किशोर यांचा मृतदेह कोकणागडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पुलाच्या सिमेंटच्या पायलीमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला.

Maharashtra TimesKolhapur Crime : पुण्यातील येरवड्यात दोघांची दोस्ती, जेलमधून बाहेर आल्यावर केला मोठा कांड, CCTV फुटेजमध्ये… किणी टोलनाक्याजवळ गोंधळ
संपत्तीच्या वादातून किशोर यांचा जावई अमित लांजेवार याने आपल्या मित्राच्या मदतीने मारहाण करून खून केल्याचे स्पष्ट झाल्याने दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा