Headlines

Shreyas Talpade : ‘मी होम लोनसाठी पात्र नव्हतो’, पहिलं घर घेण्यासाठी शाहरुखने श्रेयस तळपदेला केलेली मदत, अभिनेत्यानं सांगितला किस्सा


Shreyas Talpade : मराठी अभिनेता श्रेयस तळपदेनं त्याच्या पहिल्या घराचा किस्सा सांगितला आहे. पहिलं घर घेण्यासाठी शाहरुख खानची मदत झालेली, असं अभिनेत्यानं सांगितलं.

Shreyas Talpade On Shah Rukh Khan
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – श्रेयस तळपदे हा मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता असून त्यानं हिंदी सिनेमातही काम केलं आहे. त्याचबरोबर त्यानं काही मराठी सिनेमांचीही निर्मिती केली आहे. अभिनेता सध्या त्याच्या ‘मर्दिनी’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. श्रेयस ‘मर्दिनी’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून अनेक माध्यमांना मुलाखती देत आहे. अशातच आता फराह खानसोबत साधलेल्या संवादात अभिनेत्यानं त्याच्या घराचा किस्सा सांगितला असून घर घेण्यासाठी शाहरुख खानची मदत झाली असल्याचं श्रेयसनं सांगितलं आहे.

श्रेयसनं सांगितला पहिल्या घराचा किस्सा

फराह खान श्रेयस तळपदेच्या घरी गेलेली. अभिनेत्याच्या घरातील व्लॉगचा व्हिडिओ फराहनं तिच्या युट्युब चॅनलवर शेअर केला आहे. फराह खान आणि श्रेयस तळपदे यांनी ‘ओम शांती ओम’ सिनेमामध्ये एकत्र काम केलंय. त्यामुळे फराह खानला भेटल्यानंतर श्रेयसनं ‘ओम शांती ओम’ सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर फराह आणि शाहरुखने त्याला घर खरेदी करण्यास कशी मदत केली, याबद्दलही सांगितलं आहे. श्रेयस म्हणाला की, ‘आमचं पहिलं घर कोणामुळे झालं, माहिती आहे का? ते ‘ओम शांती ओम’ सिनेमामुळे’. हे ऐकून फराहला आश्चर्य वाटलं आणि ती म्हणाली, ‘अरे! मी त्या घरी आले होते. ते घर खूपच सुंदर होतं.’

Mardini Movie : ‘पोलीस खातं आता मला पेन्शन देईल…’ जितेंद्र जोशीचा खास किस्सा

त्यानंतर पुढे श्रेयसने घर घेण्याचा किस्सा सांगितला. अभिनेता म्हणाला, ‘त्यावेळी मी होम लोनसाठी पात्र नव्हतो. बँकेतील अधिकाऱ्यांनी मला विचारलं की, तू आणखी कोणते चित्रपट करतोयस? तेव्हा मी ‘ओम शांती ओम’चं नाव सांगितलं. त्यांनी विचारलं, या चित्रपटात कोण आहे? मी म्हणालो, शाहरुख खान. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शक कोण आहेत, असं विचारलं. मी फराह खान असं म्हटलं. मग त्यांनी विचारलं, त्यांच्याकडून एक पत्र मिळू शकेल का?’
Maharashtra TimesGirija Oak : ‘आता आम्ही फार संपर्कात नाही, त्यांचंही कुटुंब आहे’, वडील गिरीश ओक यांच्याबद्दल गिरिजा ओकचं वक्तव्य
‘मी लगेच फराहला फोन केला. अवघ्या दोन दिवसांत तिनं शाहरुख खानकडून बँकेसाठी शिफारसपत्र लिहून घेतलं. त्याच संध्याकाळी माझं होम लोन मंजूर झालं आणि त्यामुळे आम्हाला आमचं पहिलं घर खरेदी करता आलं.’ असं श्रेयसनं शेवट सांगितलं.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा