लोक सोशल मीडियावर एक “लाँड्री हॅक” जोरात शेअर करत आहेत वॉशिंग मशीन किंवा ड्रायरमध्ये बर्फाचे तुकडे टाकणे. व्हिडिओमध्ये दाखवलं जातं की कपडे टाकून काही बर्फाचे तुकडे घातले की कपडे “इस्त्री न करता” मोकळे आणि सुरकुत्या नसलेले बाहेर येतात. हे पाहून अनेकांना वाटतं की बर्फाने डाग देखील निघतात, पण खरी गोष्ट थोडी वेगळी आहे.

लोक हे का करतात?
लोकांना “iron-free clothes” किंवा “instant wrinkle fix” हवा असतो. इस्त्री करण्याचा कंटाळा, वेळेचा अभाव आणि सोपी ट्रिक्स शोधण्याची सवय यामुळे असे व्हिडिओ व्हायरल होतात. पण हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की लाँड्री सायन्स मध्ये तापमान, डिटर्जंट आणि फायबर ट्रीटमेंट यांचा योग्य वापर आवश्यक असतो. फक्त बर्फ टाकून कपडे साफ होत नाहीत. डाग काढण्यासाठी योग्य पद्धती वेगळी आहे. उदाहरणार्थ, तेलाचे डाग असतील तर डिशवॉशिंग लिक्विड थेट लावून धुणे उपयुक्त ठरतं. घामाचे किंवा पिवळसर डाग असतील तर व्हिनेगर किंवा ऑक्सिजन बेस्ड क्लीनर वापरला जातो. काही वेळा कपडे आधी भिजवून ठेवणे खूप प्रभावी ठरतं. त्यामुळे “ice cube hack” हा केवळ एक अर्धा सत्य असलेला इंटरनेट ट्रेंड आहे.
2
वॉशिंग मशीन किंवा ड्रायरमध्ये बर्फाचे तुकडे टाकल्यावर काय होते
वॉशिंग मशीन किंवा ड्रायरमध्ये बर्फाचे तुकडे टाकल्याने कपडे अधिक स्वच्छ होतात किंवा त्यांची ‘डीप क्लिनिंग’ होते, असा अनेकांचा समज आहे. मात्र, हे पूर्णपणे चुकीचे आहे. कपडे स्वच्छ होण्यामागे डिटर्जंट, पाण्याचे योग्य तापमान आणि वॉशिंग मशीनची धुण्याची प्रक्रिया हेच मुख्य घटक असतात. बर्फ हा कोणताही स्वच्छता करणारा पदार्थ नसल्यामुळे तो डाग किंवा घाण काढत नाही.
कोणत्या कपड्यांवर हा प्रयोग टाळावा?
रेशीम , लोकरीचे, भरतकाम असलेले कपडे, सिक्विन किंवा नाजूक फॅब्रिक असलेले कपडे ड्रायरमध्ये टाकणेच अनेकदा योग्य नसते. अशा कपड्यांवर बर्फाचा प्रयोग केल्यास त्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते. तसेच ड्राय क्लीन करण्याच्या सूचना असलेल्या कपड्यांवर हा प्रयोग करू नये.
तज्ज्ञ काय सांगतात?
तज्ज्ञांच्या मते, बर्फाचा हा हॅक काही प्रमाणात सुरकुत्या कमी करण्यास मदत करू शकतो, मात्र तो इस्त्रीचा पर्याय नाही. तसेच हा उपाय डाग काढण्यासाठी किंवा कपडे अधिक स्वच्छ करण्यासाठी अजिबात उपयोगी नाही. कपड्यांवरील डागांचे स्वरूप लक्षात घेऊन योग्य डिटर्जंट, स्टेन रिमूव्हर किंवा प्री-ट्रीटमेंट वापरणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
सोशल मीडियावरील प्रत्येक हॅकवर विश्वास ठेवू नका
आजकाल सोशल मीडियावर दररोज नवीन घरगुती उपाय आणि लाँड्री हॅक्स व्हायरल होत असतात. काही ट्रिक्स खरोखर उपयुक्त असतात, तर अनेक व्हिडिओ केवळ व्ह्यूज आणि लाईक्स मिळवण्यासाठी तयार केलेले असतात. त्यामुळे कोणताही प्रयोग करण्यापूर्वी त्यामागील वैज्ञानिक कारण समजून घेणे आणि विश्वसनीय स्रोतांमधून माहिती तपासणे अधिक महत्त्वाचे आहे.

