Headlines

Success Story of Ratnagiri Girl Prajakta Bongale Selected in American Army


लहानपणापासूनच प्राजक्ताने सैन्यात जाण्याचे स्वप्न बाळगले होते. मात्र एका अपघातामुळे ते अधुरं राहिलं. पण तिने जिद्द सोडली नाही. लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतरही तिने आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवला आणि त्या स्वप्नांच्या दिशेला तिने मार्गक्रमण केलं. अखेर तिचं सैन्यदलात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे.

prajakta bongale
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, रत्नागिरी : लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील असलेली कोकण सुकन्या प्राजक्ता भांबुरे बोंगाळे हिची आता थेट अमेरिकेच्या सैन्य दलात निवड झाली आहे. प्राजक्ता अमेरिकन सैन्यदलात सध्या मेडिकल विभागात सेवा देत आहेत. या संपूर्ण प्रशिक्षणादरम्यान प्राजक्ता (सारा) बोंगाळे यांनी उत्कृष्ट नेमबाजीसाठी मार्क्समनशिप पदक प्राप्त केले आहे. तसेच संपूर्ण प्रशिक्षण बॅचमध्ये सर्वोच्च शैक्षणिक गुण मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

शालेय शिक्षण दापोली येथील ए. जी. हायस्कूल येथे केले. इयत्ता दहावीनंतर रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातून बीएस्सी केली. मुंबईतील रूपारेल महाविद्यालयातून तिने Encocrinology (अंतःस्रावी विज्ञान) या विषयातून तिने एमएस्सी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. विवाहनंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली. अमेरिकन सैन्य दलाचे (US Army) अत्यंत कठीण आणि शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक तब्बल आठ महिन्यांचे कठोर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून अधिकृतपणे पदवी ग्रहण (Graduation) केली आहे.

शालेय शिक्षण घेतानाच सैनिक बनण्याचं स्वप्न

प्राजक्ताला लहानपणापासूनच सैन्याविषयी मोठे आकर्षण होते. देशसेवेची भावना व सैन्याच्या गणवेशाविषयी आदर होता. दापोलीमध्ये शालेय शिक्षण घेत असतानाच तिने हे स्वप्न मनात बाळगले होते. परंतु, एका अनपेक्षित अपघातामुळे तिला हा विचार बाजूला ठेवावा लागला. सायन्समधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विवाहानंतर अमेरिकेत कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना तिने आपली आवड आणि करिअरकडेही तितकंच लक्ष दिलं.

खडतर प्रशिक्षण केले पूर्ण

मॉडेलिंग आणि कॅन्सर संशोधन क्षेत्रात कार्यरत असतानाही तिने स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष दिले. नियमित व्यायाम, शिस्तबद्ध दिनचर्या आणि सकारात्मक मानसिकता या बळावर तिने अमेरिकन सैन्याचे ते खडतर प्रशिक्षण केवळ पूर्णच केले नाही तर यशही मोठे यशही मिळवून दाखवलं. कुटुंबात सैन्याची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही, तिचा आजवरचा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे.

मॉडेलिंग क्षेत्रातही कार्य करत किताब मिळवला

प्राजक्ता अमेरिकेत व्यावसायिक क्षेत्रात Clinical Research Scientist (क्लिनिकल रिसर्च सायंटिस्ट) म्हणून कार्यरत होती. तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर Global Strategic Alliance Millets Ambassador म्हणून जागतिक प्रतिनिधित्वही केले. मॉडेलिंगची आवड असलेल्या प्राजक्ताने सौंदर्य क्षेत्रात USA Mrs. Midwest Universe सारखा प्रतिष्ठेचा किताबही तिने मिळवला. परंतु तिची देशसेवेची जिद्द तिला स्वस्थ बसू देत नव्हती याच जिद्दी व मेहनतीमुळे तिने मोठे यश मिळवले आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा