6 mysterious deaths reported in vasai virar nalasopara belt within 14 days; नालासोपाऱ्यात भयानक कांड, 14 दिवसांत 6 जणांच्या बॉडी रस्त्यांवर सापडल्या, नेटफ्लिक्स नाही तर रिअल सीरीजने नागरिक भयभीत
6 mysterious deaths reported in vasai virar nalasopara belt within 14 days; नालासोपाऱ्यात भयानक कांड, 14 दिवसांत 6 जणांच्या बॉडी रस्त्यांवर सापडल्या, नेटफ्लिक्स नाही तर रिअल सीरीजने नागरिक भयभीत
वसई-विरार आणि नालासोपारा परिसरात गेल्या १४ दिवसांत तब्बल ६ मृतदेह सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुंबई-अहमदाबाद हायवेवर मृतदेह टाकण्याचे सत्र सुरूच असून पोलीस तपास करत आहेत.
नालासोपाऱ्यात भयानक कांड, 14 दिवसांत 6 जणांच्या बॉडी रस्त्यांवर सापडल्या, नेटफ्लिक्स नाही तर रिअल सीरिजने नागरिक भयभीत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, पालघर : वसई-विरार आणि नालासोपारा पट्ट्यात सध्या भीतीचे सावट पसरले असून, गुन्हेगारांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून धुमाकूळ घातल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या १४ दिवसांत तब्बल ६ मृतदेह सापडल्याने संपूर्ण पालघर जिल्हा हादरून गेला आहे. मुंबई-अहमदाबाद हायवे लगतच्या निर्जन स्थळांचा वापर आता मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी होत असल्याचा प्रकार समोर आल्याने सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.
कचरा उपसून पाहिला तर..
रविवारी संध्याकाळी विरार फाट्यावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून सुटलेल्या दुर्गंधीने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले. जेव्हा पोलिसांनी कचरा उपसून पाहिला, तेव्हा ४५ ते ५० वयोगटातील एका व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मांडवी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असला तरी, हा नैसर्गिक मृत्यू आहे की घातपात, याचा तपास सुरु आहे.
१४ दिवसांतील घटनांचा थरार
गेल्या दोन आठवड्यात वसई-विरारच्या वेगवेगळ्या भागात सापडलेल्या मृतदेहांच्या मालिकेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे.
धानिवबागमध्ये अवघ्या ६ वर्षांच्या चिमुकलीचा विहिरीत मृतदेह सापडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तर पेल्हार फाट्यावर एका व्यक्तीचा शिरच्छेद करून त्याची क्रूर हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. नालासोपारामध्ये डी-मार्ट सारख्या वर्दळीच्या परिसरातील नाल्यात महिलेचा मृतदेह आढळला. तर फूलपाडा व विरार फाटा येथेही अज्ञात पुरुषांचे मृतदेह मिळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हायवेवर गुन्हेगारांचं साम्राज्य?
मुंबई-अहमदाबाद हायवेवरील सूनसान जागा आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव गुन्हेगारांसाठी एक संधी ठरतो आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन मृतदेह या ठिकाणी फेकले जात असल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे. “आमच्या घराबाहेर पडतानाही आता भीती वाटते, पोलिसांचा धाक उरला आहे की नाही?” असा संतप्त सवाल स्थानिक विचारत आहेत.
पोलीस यंत्रणेसमोर आव्हान
एकामागून एक घडणाऱ्या या घटनांमुळे वसई-विरार पोलीस दलासमोर आता तपासाचे मोठे आव्हान आहे. एका बाजूला मृतदेहांची ओळख पटवणे आणि दुसरीकडे हे मृत्यू नेमके कशामुळे झाले, याचा छडा लावणे हे अशा दोन्ही स्तरावर आता पोलिसांना काम करायचे आहे. तसेच हायवेवर गस्त वाढवण्याची आणि सीसीटीव्ही वाढवण्याची मागणीही आता नागरिकांकडून होऊ लागली आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा