Headlines

Sangli Kalapur Gajubhai Yongendra Salunkhe Scored 35 Marks in All Subjects in 10th Standard; भावाचा नादच खुळा! दहावीत सर्व विषयांत 35 मार्क्स, गावात बॅनरबाजी; सांगलीत सोशल मीडियावर गजूभाईचीच चर्चा


Sangli Gajubhai Yongendra Salunkhe Scored : नांदेडनंतर सांगलीमधील खानापूर तालुक्यात देखील गजूभाई योगेंद्र साळुंखे या विद्यार्थ्याला 10वीत सर्व विषयांमध्ये 35 टक्के मार्क्स मिळाले आहेत.

Gajubhai Yongendra Salunkhe Scored 35 Marks in All Subjects in 10th Standard
सांगली कमळापूर गजूभाई साळुंखे १०वी निकाल(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : सुरज उर्फ गजूभाई योगेंद्र साळुंखे याने दहावीमध्ये 35 टक्के गुण मिळवून आपलं नाव कमावलं आहे. सांगली जिल्ह्यातील आणि खानापूर तालुक्यातील कमळापूर गावातील या गजूभाईची मात्र चर्चा या यशामुळे सर्वत्र रंगू लागली आहे. मग काय गावात बॅनर लागली. गजू भाईचं स्वागतही करण्यात आलं. निकाल कळताच काही क्षणातच कमळापूरचा गजूभाई सर्वत्र फेमस झाला आणि या गजूभाईला शुभेच्छा द्यायला मित्र परिवार आणि गावकऱ्यांनी गर्दी त्याच्या घरी गेली होती.

चर्चा सुरु करण्यास भाग पाडलं

गजूभाई साळुंखेला मराठीत 35, हिंदीत 35, इंग्रजीत 35, गणितात 35, विज्ञानामध्येही 35 आणि समाजशास्त्रामध्येही 35 मार्क्स पडून आपलं नावाची चर्चा सुरु करण्यास भाग पाडलं आहे. निकाल जाहीर होताच काही मिनिटांतच गजूभाईची चर्चा संपूर्ण गावभर रंगली. मित्र परिवार, गावकरी आणि नातेवाईकांनी त्याच्या घरी गर्दी करत शुभेच्छांचा वर्षाव केला. एवढंच नाही तर गावात ठिकठिकाणी अभिनंदनाचे बॅनरही झळकू लागले आहेत.
Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar News : माती खचल्यानं विहिरीत कोसळले, ढिगाऱ्याखाली बापासह दोन्ही लेक दबले गेले, तिघांचा करुण अंत; माऊलीचा आक्रोश

भावाचा नादच खुळा

भावाचा नादच खुळा म्हणत आता सोशल मीडियावर गजू भाईचे मीम्स, स्टेटस आणि पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. कमी मार्क मिळाले म्हणून नाराज न होता, आपल्या स्टाईलमध्ये सेलिब्रेशन करणाऱ्या या भावाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. दहावीत प्रत्येक विषयात 35 गुण मिळवत सांगलीच्या गजू भाईनं सोशल मीडियावर वेगळीच हवा केलीये. कमी गुणांवरही आनंद साजरा करता येतो, हेच या भावाने दाखवून दिलंय.

श्रुतीची दहावीत काठावर बाजी

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. सर्वत्र 90 टक्केपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंतांचे कौतुक होत असताना नांदेडमध्ये मात्र एका विशेष निकालाची चर्चा रंगली आहे. ती चर्चा आहे 35 टक्के गुण मिळवून यशाला गवसणी घालणाऱ्या श्रुती दिगंबर पाटील भानानगरे हिची. श्रुतीला सर्वच विषयात 35 पैकी 35 गुण मिळाले आहे. विशेष म्हणजे श्रुती ही शेतकरी कन्या असून शेतीकाम करून तीने हे यश संपादन केलं आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा