Baramati Katfal Big Sports Hub : ‘कटफळ येथे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभरण्यात येणार आहे. ऑलिम्पिक दर्जाच्या सुविधा असणाऱ्या घटकांचा यामध्ये समावेश आहे. हा प्रकल्प दर्जेदार उभारण्यात येणार आहे’, असं बारामती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मधुकर सुर्वे यांनी म्हटलं आहे.

विविध खेळांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध
कटफळच्या माळरानावर २० हजार ७६७ चौरस मीटर क्षेत्रावर जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उभारण्यात येणार आहेत. क्रीडा संकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जिल्हा, विभागीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धा बारामतीत आयोजित करण्याची क्षमता निर्माण होणार आहे. विविध खेळांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून केला आहे.
Pune Crime : ना 17 करोडचा महाल, ना दोन चार्टर्ड विमानं बूक; माझी ऐपत 4 कोटींची, वऱ्हाडींवर पर कपल 81 हजार खर्च, सियाच्या बाबांचा हिशोब
बारामती, इंदापूर, दौंड, फलटण; तसेच पुरंदर परिसरातील अनेक खेळाडूंमध्ये क्षमता असूनही आधुनिक सुविधांच्या अभावामुळे त्यांची प्रगती खुंटते. कटफळ येथील क्रीडा संकुल पूर्ण झाल्यानंतर या खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण, स्पर्धा आणि तज्ज्ञ मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळणार आहे. यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडविण्याचा मार्ग अधिक सुकर होणार असल्याचे क्रीडा क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
सर्वांसाठी अत्याधुनिक सुविधा
४०० मीटरचा आठ लेनचा सिंथेटिक अॅथलेटिक्स ट्रॅक. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या निकषांनुसार तयार होणाऱ्या या ट्रॅकवर धावपटूंना दर्जेदार सरावाची संधी मिळणार आहे. यासोबतच लांब उडीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. फुटबॉलप्रेमींसाठी १०५.४ बाय ६८ मीटर आकाराचे नैसर्गिक गवतावरील मैदान तयार करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्यास सक्षम असे हे मैदान बारामतीच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय लिहिणार आहे.
Pune-Nashik Railway Project : कर्जही मिळेना अन् विकताही येईना; प्रकल्प रद्द पण सातबाऱ्यावर शिक्के कायम, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गामुळे शेतकरी हवालदिल
५० मीटर बाय २५ मीटरचा ऑलिम्पिक दर्जाचा स्वीमिंग पूल. याशिवाय डायव्हिंगसाठी स्वतंत्र पूल आणि नवशिक्यांसाठी लहान पूल उभारण्यात येणार आहे.
२०० मीटर लांबीचे स्केटिंग रिंग
७० मीटर लांबीचे आर्चरी रेंज मैदान
पाच नेट्ससह क्रिकेट प्रॅक्टिस पिच उभारण्यात येणार आहेत. क्रिकेट, स्केटिंग आणि तिरंदाजी या खेळांमध्ये वाढच्या रुचीचा विचार करुन या सुविधा नियोजित करण्यात आल्या आहेत.
Gulabrao Patil : अरे राजा, आधी स्वतःचा आवाज तर सुधार; गुलाबराव पाटलांची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका, ठाकरेंचे 14 आमदार फुटण्याचा दावा
बारामतीची ओळख ‘स्पोर्ट्स हब’
‘बारामती क्रीडा क्षेत्रातही मोठी गुंतवणूक होत असल्याने बारामतीची ओळख ‘विकासाचे मॉडेल’ या पलीकडे जाऊन ‘स्पोर्ट्स हब’ म्हणून निर्माण होण्याची अपेक्षा आहे. आजवर पुणे, मुंबई किंवा कोल्हापूरसारख्या शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा आता बारामतीतच मिळणार असल्याने ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठा दिलासा मिळणार आहे’, असं बारामती क्रिकेट क्लबचे सदस्य ॲड. शहानूर शेख यांनी म्हटलं आहे.

